नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यात देगलूर येथे एक जबरी चोरी झाली आहे. त्यात 78 हजारांचा ऐवज लंपास झाला आहे. विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 हजार 996 रुपयांचा मोबाईल बळजबरीने चोरून नेला आहे. दत्तनगर भोकर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 45 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समीरा बाग येथे एक घरफोडण्यात आले असून त्यातून 21 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. मुदखेड, माहूर आणि किनवट या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. त्यातील एका दुचाकीची किंमत लिहिले नाही. इतर दोन दुचाकींची किंमत 60 हजार रुपये आहे. कासराळी ता.बिलोली येथे एका शेतातून 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचे दोन बैल आणि एक गोरा चोरीला गेला आहे. नवा मोंढा येथील एसबीआय बॅंकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचे 44 हजार रुपये चोरण्यात आले आहेत. विश्रामगृह नरसी येथून विद्युत वायर किंमत 4 हजार 500 रुपयांची चोरीला गेली आहे. या सर्व चोरी प्रकरांमध्ये एकूण 3 लाख 88 हजार 499 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे. याबाबत स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत.
Related Posts
कुंटूर सोबत अर्धापूर पोलीसांनी सुध्दा आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर टाकली धाड
नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुध्दा आयपीएल सट्टा चालविणाऱ्या दोघांविरुध्द महाराष्ट्र जुगार कायद्याची कार्यवाही करण्यात आली आहे. एकाच दिवशी कुंटूर आणि…
नांदेड-मरळक रस्त्यावर सहाय्यक प्राध्यापक व त्यांच्या पत्नीला मारहाण करून लुट
नांदेड(प्रतिनिधी)-मरळक ते नांदेड जाणाऱ्या रस्त्यावर दोन अज्ञात चोरट्यांनी एका सहाय्यक प्राध्यापकाला पत्नीसह असतांना लुटले आहे. त्यात 1 लाख रुपयांचा ऐवज…
दारुच्या नशेत कुपूत्राचा आई-वडील आणि भावाला पाण्यात विष टाकून मारण्याचा प्रयत्न
नांदेड(प्रतिनिधी)-आपली पत्नी माहेरला का नेऊन सोडली. या रागातून एका कुपूत्राने आपले आई-वडील आणि भाऊ मरावे म्हणून पिण्याच्या पाण्यात विषारी औषध…