नांदेड,(प्रतिनिधी)- बामणी ते दाभड रत्स्यावरील कॅनाल जवळ बचतगटांचे कलेक्शन करणाऱ्या एकाला शस्त्रांचा धाक दाखवून १ लाख ७५ हजारांची लूट करण्यात आली आहे.
शंकर लक्ष्मण चिमटे हे अनेक गावांमधून बचत गटांचे पैसे जमा करून परत येथ असतांना बामणी ते दाभड रस्त्यावर कॅनाल जवळ त्यांच्या दुचाकीला अडवण्यात आले.अडवणारे दरोडेखोर दोन दुचाकीवर तीन होते. शस्त्रांचा धाक दाखवून दरोडेखोरांनी त्यांच्या जवळील एक लाख ७५ हजार रुपयांची बॅग बळजबरीने चोरून नेली आहे.घटनेची माहिती मिळताच अर्धापूरचे पोलीस आणि नांदेड जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार कॅनाल जवळ दरोड्याची घटना घडली त्याठिकाणी पोहचले आहेत.पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहे.