अर्धापूर(प्रतिनिधी)-शहरातील गवळी गल्ली येथील दिपक फलाजी विरकर वय 40 वर्षे यांचे दि.1 जुन बुधवार रोजी रात्री अपघातात दुर्दैवी निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आज दि.2 जुन गुरुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता अर्धापूर येथे होणार आहे. अर्धापूर शहरामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून वृत्तपत्र विक्रेता म्हणून अनेक दैनिकांचे अविरतपणे वितरण करणारे व अर्धापुर शा. गोदावरी अर्बन बॅंकेचे बचत ठेव प्रतिनिधी अत्यंत कष्टाळू व मेहनती वृत्ती असलेले दीपक विरकर यांचे अपघातात निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो.त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी, दोन मुले,दोन भाऊ असा परिवार आहे. ते वृत्तपत्र विक्रेते रमेश विरकर व पत्रकार गुणवंत विरकर यांचे चुलत बंधू होत.
Related Posts
दीड महिन्यापासून बेपत्ता असलेली 15 वर्षीय बालिका नांदेड पोलीसांनी शोधली
नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या आईच्या रागावण्याने घरातून निघून गेलेल्या 15 वर्षीय बालिकेला अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष नांदेडने दीड महिन्यानंतर शोधून त्या बालिकेच्या…
ऍड.एम.आर.शर्माच्या दोन तोष्णीवाल आरोपींना न्यायालयाने ठोठावली शिक्षा
उलट तपासणीत वास्तव न्युज लाईव्हचे प्रश्न विचारले होते नांदेड(प्रतिनिधी)-घरात नळाच्या कामावरुन झालेल्या वादानंतर आपली मोठी वहिणीला शिवीगाळ आणि तिच्या मुलाला…
तरुणाईने थट्री फस्ट शांततेत साजरा करा-अपर पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार
नांदेड(प्रतिनिधी)-सन 2023 वर्ष संपण्यास आता काही तास शिल्लक राहिले आहेत. या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच स्वागत करण्यासाठी तरुणाई…