देगलूरमध्ये महिलेचे गंठण तोडले; वस्तीगृहात चोरी, जनावर चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर येथे एका महिलेच्या गळ्यातील 1 लाख 75 हजार रुपयांचे गंठण तोडण्यात आले आहे. पद्‌व्युत्तर वस्तीगृह विष्णुपूरी येथून एका विद्यार्थ्याचे 3 हजार रुपयांचे साहित्य चोरीला गेले आहे. मुगट शिवारातून 30 हजार रुपये किंमतीचे पशुधन चोरीला गेले आहे. चैनापुर शिवारातून 50 हजार रुपयांचे साहित्य वेगवेगळ्या शेतातून चोरीला गेले आहे.
रेणुका बसवराज शेटकार यांनी दिलेल्या तक्ररीनुसार 6 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजता शारदानगर देगलूर येथून कोणी तरी अनोळखी माणसाने त्यांच्याच्या गळ्यातील साडे तीन तोळ्याचे, 1 लाख 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण चालत्या गाडीवरून बळजबरीने चोरून नेले आहे. देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक रेडेकर अधिक तपास करीत आहेत.
डॉ.धिरज किशोर बेंडाळे हे पदव्युत्तर वस्तीगृह विष्णुपूरी येथे राहतात आणि शिक्षण घेतात. दि.6 जुलैच्या मध्यरात्री 12.30 ते पहाटे 6 वाजेदरम्यान त्यांच्या रुममधील निळ्या रंगाची बॅग ज्यामध्ये मोबाईल 38 हजार रुपये किंमतीचा, वाहन चालक परवाना, एटीएम कार्ड, व इतर कागदपत्र ठेवलेले होते. ती बॅग कोणी तरी चोरुन नेली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस हवालदार पेदे हे करीत आहेत.
शामराव शंकरराव कल्याणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 जुलैच्या रात्री 10 ते 6 जुलैच्या पहाटे 6 वाजेदरम्यान मुगट शिवारातील त्यांच्या आखाड्यावर बांधलेले ढवळ्या रंगाचे दोन बैल किंमत 30 हजार रुपये कोणी तरी चोरून नेले आहे. मुदखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार आलेवार अधिक तपास करीत आहेत.
आमरु बंडू पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 जुलैच्या रात्री 10 ते 6 जुलैच्या सकाळी 6 वाजेदरम्यान त्यांच्या शेतातील पाण्याची मोटार आणि शेजारच्या शेतातील पाण्याची मोटार असे साहित्य कोणी तरी चोरून नेले आहे. त्या साहित्याची किंमत 50 हजार रुपये आहे. अर्धापूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार आणेबोईनवाड अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *