नांदेड ग्रामीण पोलीसांनी अटक केलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या इंलिगल डिटेंशनचे काय?

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी सुनिल सुलगेकर या युवकाचा खून झाला या प्रकरणात अटक केलेला आरोपी अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालक निघाला. न्यायालयासमक्ष वकीलांनी सांगितलेल्या सत्यतेनंतर त्या बालकाची रवानगी विधी बाल न्यायमंडळाकडे करण्यात आली.पण पोलीसांनी अटक केल्यानंतर बाल न्यायमंडळापर्यंत जाण्याचा त्या विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या बेकायदेशीर अटकेचा जबाबदार कोण ? याचे उत्तर एक आठवड्यात सुध्दा सापडले नाही.
18 डिसेंबर ते 22 जानेवारी दरम्यान सुनिल सुलगेकर (21) या युवकाचा खून झाल्याची तक्रार त्याच्या बंधूने दिल्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा क्रमंाक 41/2022 दाखल केला. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे 302, 201, 34 जोडण्यात आली. कारण सुनिल सुलगेकरचा खून करून त्याचे प्रेत जाळण्यात आले आणि ते नदीमध्ये प्रवाहित करण्यात आले. असा या पोलीस प्राथमिकीमध्ये उल्लेख आहे.
दि.23 जानेवारी रोजी नांदेड ग्रामीण पोलीसांनी पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब  यांच्या नेतृत्वात एका युवकाला अटक करून न्यायालयात आणले आणि त्याची पोलीस कोठडी मागण्याची तयारी करत असतांना त्या अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालकाचे वकील ऍड. मोहन बंटे यांनी न्यायालयात पोलीसांनी आणलेला अभिलेख दाखवला. त्या अभिलेखानुसार त्या बालकाचे वय 18 वर्ष एक महिना लिहिलेले होते. मात्र पोलीसांनी आणलेल्या अभिलेखानुसार त्याचे वय 18 डिसेंबर रोजी 18 वर्ष पुर्ण होण्यासाठी कांही दिवसांनी कमी दिसत होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीचा अर्ज घेतलाच नाही आणि हा प्रकार विधी बाल न्यायमंडळाकडे पाठविण्याची सुचना पोलीसांना केली. त्यानुसार नांदेड ग्रामीण पोलीसांनी त्या दिवशी त्या बालकाला विधी न्यायमंडळाकडे पाठवले.
आज या घटनेला एक आठवडा पुर्ण झाला आहे. पण त्या बालकाला पोलीस कोठडी मागण्याकरीता आणले होते. तेंव्हा त्या बालकाच्या अटकेची स्टेशन डायरी नोंद क्रमांक आणि वेळ त्या कागदपत्रांमध्ये लिहिला होता. तसेच पोलीस ठाण्यात अटक आरोपी नोंदवही असते. त्या नोंदवहीमध्ये सुध्दा त्या बालकाचे नाव लिहिले असेल. याचा अर्थ त्या बालकाच्या अटकेच्यावेळेपासून त्याला बाल न्यायमंडळासमक्ष हजर करे पर्यंत ही कार्यवाही बेकायदेशीर अटक (इंलिगल डिटेंशन) या सदरात मोडते असे कांही वकीलांनी सांगितले. त्यामुळे या बाबत सुध्दा पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नक्कीच विचार करून योग्य कार्यवाही करायला हवी.
हा बालक विधी न्यायमंडळासमक्ष हजर केल्यानंतर कोरोना बाधीत आहे असा अहवाल आला. त्यामुळे सध्या तो उपचारात आहे. त्याच्या उपचारानंतर बाल न्यायमंडळाकडून त्याची तपासणी होईल आणि त्यानंतर त्यांच्या अहवालानुसार त्या बालकावर बाल न्यायमंडळाकडे कायद्याच्या प्रक्रियेतील बाबी पुर्ण होतील. हा बालक अत्यंत छोट्या कुटूंबातील आहे. त्याची आई एका मंदिरामध्ये साफसफाई करून आपले जीवन चालवत असते आणि तिच्या पुढे आलेला हा प्रसंग अशा प्रकारे बकायेदशीर अटकेच्या स्वरुपात उभा राहिला आहे. पण त्या महिलेला अर्थात त्या बालकाच्या आईला ही सर्व बाब माहित असेलच असे म्हणता येणार नाही. तरीपण काही चुकले असेल तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नक्कीच या चुकलेल्या बाबीची दखल घेवून योग्य कार्यवाही करायला हवी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *