नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत १०-११ बेकायदा बायो डिझेल विक्री केंद्र राजरोस सुरु

दर महा १५०० ‘मोदकांचा’ प्रसाद जमवला जातोय ! 
नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप मालकांनी निवेदन देऊन बायो डिझेल विक्री बंद करण्याची विनंती केल्यानंतर सुद्धा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत १०-११ बायो डिझेल विक्रीची ठिकाणे राजरोस पणे सुरु आहेत.खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक विक्री ठिकाणातून १५० मोदकांचा नैवेद्य चढवला जात आहे.भोग प्राप्त कोण करीत असेल याबाबत काही लिहिण्याची आवश्यकता आहे काय?
                          शासनाने बायो डिझेल प्रकार हा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध व्हावा म्हणून तयारीनं केला,शेतकऱ्यांसाठी कमी किमतीत हे डिझेल उपलब्ध करून देण्याची सोया आहे.पण त्याचा वापर करणारे नवीन डिझेल माफिया तयार झाले आहेत.त्यातून होणारी मोठी आणि बेकायदा कमाई बरीच मोठी आहे.बेकायदा कमाई करण्यासाठी ‘मोदकांचा’ प्रसाद चढवणे अत्यंत आवश्यक बाब आहेच.बायो डिझेलवर महसूल विभागाचे मूळ नियंत्रण असते.पण प्रत्येक बेकायदा कामावर पोलीस विभाग आपोआपच येत असतो.पोलीस विभागाबद्दल बोललेच जाते की,’पोलीस खाते करील तेच होईल’ म्हणून त्याच्या ‘आशीर्वादा’ शिवाय कोणताही बेकायदा ‘धंदा’ चालवणे अवधड असते.यात कोणालाही शंका असण्याचे कारण नाही.बायो डिझेल विक्री ट्रकसाठी केली जात आहे.त्यामुळे आमच्या कायदेशीर व्यवसायावर गदा येत असल्याचे निवेदन सर्व पेट्रोल पंप चालकांनी नांदेडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दिले होते.पण तरीही हा ‘धंदा’ बंद झालेला नाही.
                      नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळपास १०-११ असे बेकायदा बायो डिझेल विक्री केंद्र सुरु आहेत. त्यात हैद्राबाद वळण रस्त्यावर पूल शेजारी,त्या पुढे एका शाळेजवळ, वाजेगाव,एका धाब्याच्या बाजूला,तुप्पा पाटी जवळ,असर्जन जवळ,दूध डेअरी जवळ अश्या ठिकाणी ते बायो डिझेल विक्री केंद्र बिनधास्त पणे सुरु आहेत.बायो डिझेल भरलेला ट्रक उभा करून त्यातून एक अश्व शक्तीच्या मोटारीने बायो डिझेल थेट ट्रक मध्ये टाकले जात आहे.कमी रकमेत मिळणारे हे बायो डिझेल भरून ट्रक चालवणे मोटार वाहन कायद्याप्रमाणे सुद्धा बेकायदेशीर आहेच.या बेकायदा विक्रीमुळे शेतकऱ्याना डिझेल मिळत नाही.ट्रक मालकाला न सांगत चालक त्यात बायो डिझेल भरून ट्रकचा सत्यानाश करीत आहेत.
                     या प्रत्येक बायो डिझेल विक्री केंद्रा मधून ‘मोदक’ जमा करण्याचे काम ‘सूर्याजी पिसाळाचा’ एक पिट्टू करतो अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.नांदेड ग्रामीणच्या अधिकाऱ्याला आपली खुर्ची बदलून स्थानिक गुन्हा शाखेची खुर्ची मिळवण्यासाठी हा सर्व ‘मोदकांचा’ आणि ‘भोग’ चढवण्याचा प्रकार सुरु असेल.पण हे प्रयत्न करणाऱ्यांनी स्थानिक गुन्हे शाखा नियुक्ती तीन वर्षांची असते. असे कायद्यात आहे आणि अन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पोलीस महासंचालक कार्यालयाने जारी केलेल्या मार्गदर्शनक सूचनांमध्ये सुद्धा तसे नमूद आहे हे लक्षात ठेवले तर छान होईल. नाहीत प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) खुलेच आहे. १० ठिकाणीच्या ‘मोदकांना’ बेरीज केली तर एकूण ‘मोदक’ १५०० दरमहा जमा होतात.अबब म्हण्या पलीकडे दुसरे काही एक शब्द उपलब्ध झाले नाहीत. हा भाग फक्त एका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.जिल्ह्याचा हिशोब केला तर कोणते शब्द लिहावे यासाठी अभ्यास करावा लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *