नांदेड जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.गोदमगावकर यांना मातृशोक

नांदेड, (प्रतिनिधी) – येथील ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. दत्तात्रय गंगाधरराव गोधमगावकर यांच्या पत्नी श्रीमती शोभाताई दत्तात्रयराव गोधमगावकर (79) यांचे रविवार आज 12 डिसेंबर रोजी दुपारी 2.25 वा. औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले.  त्यांच्या पार्थिवावर औरंगाबाद, सिडको येथील वैकुंठभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मनमिळावू, शांत स्वभावाच्या श्रीमती शोभाताई या औरंगाबाद उच्च न्यायालयातील अ‍ॅड. अशोक गोधमगावकर, अ‍ॅड. पृथ्वीराज गोधमगावकर यांच्या त्या वहिणी होत्या. तर दोन मुले नांदेड न्यायालयातील जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. आशिष गोधमगावकर, अ‍ॅड. मनीष गोधमगावकर, मुलगी सौ. रचना हयातनगरकर यांच्या आई होत. त्यांच्या पश्चात सूना, नातवंडे, नात जावई असा मोठा परिवार आहे.त्यांच्या आकस्मिक जाण्यामुळे परिसर व नात्यातील लोकांनी हळहळ व्यक्त केली. विशेषतः महिला मंडळांनी तीव्र दुःख व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *