नांदेड(प्रतिनिधी)-मराठा आरक्षण मिळावे म्हणून सकल मराठा समाजाच्यावतीने राज्यभर आंदोलन सुरू केल आहे. यातच मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी रविवारपासून सर्वत्र आमरण उपोषण सुरु केल आहे. राज्य परिवहन महामंडळाने खबरदारीचा पर्याय म्हणून रविवार दि.29 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजेपासून जिल्ह्यातील सर्वच आगारातील बसेस सेवा बंद केल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात आली. शुक्रवार दि.27 ऑक्टोबर रोजी हदगाव तालुक्यातील एस.टी.बस जाळण्यात आली. याचीच खबरदारी म्हणून राज्य परिवहन महामंडळाने नांदेड-हदगाव, कंधार, मुखेड, देगलूर, बिलोली, किनवट, भोकर आणि माहूर या 9 आगारातील सर्वच मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाने बसेस सेवा रविवारपासून बंद केल्या आहेत. मराठा आरक्षण मिळण्यासाठी जालना येथील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. याच उपोषणाला राज्यात दिवसेंदिवस वाढता पाठींबा मिळत आहे. मराठा आरक्षण मिळण्यासाठी सर्वच समाजाने या आंदोलनात सहभाग घेतला असून राज्यातील अनेक गावात पुढाऱ्यांना गाव बंदी केली आहे. तर काही राजकीय पुढाऱ्यांच्या गाड्याही आंदोलकांनी फोडल्या. यातच आंदोलकांनी शुक्रवार दि.27 ऑक्टोबर रोजी नांदेड आगाराची बस पेटून दिली. यामुळे एस.टी. महामंडळाने खबरदारी घेत जिल्ह्यातील सर्वच मार्गावर धावणाऱ्या बसेस सेवा बंद केल्या आहेत याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, वरिष्ठांचा आदेश येईपर्यंत बस सेवा बंद राहणार असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळ नांदेड विभागाने दिली.
Related Posts
प्रभारी पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांची दमदार कामगिरी
नांदेड(प्रतिनिधी)-अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांच्या अत्यंत कार्यक्षम आणि कुशल नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक यांनी घेतलेल्या अत्यंत कठोर…
बायोडिझेलसह पकडलेला आरोपी नांदेड ग्रामीणच्या मलदोडेने सोडला म्हणे ; तहसीलदारंानी केली होती कार्यवाही
नांदेड(प्रतिनिधी)-15 लाखांचा पकडलेला माल जप्त करून गुन्हा दाखल केला. पण त्यातील आरोपी पोलीस अंमलदाराने सोडून दिल्याचा अजब प्रकार नांदेड ग्रामीण…
अवैध वाळू उत्खनन कधीच थांबू शकत नाही
नांदेड(प्रतिनिधी)- वाळू माफियांवर कोणतीच कार्यवाही होत नाही याचे एक चित्र काल दि.3 जुलै रोजी सायंकाळी शहरातील गोवर्धनघाट पुलाखाली पाहण्यास मिळाले.…