नांदेड (प्रतिनिधी) – राज्य मार्ग 61 नाळेश्वर – हस्सापुर -नांदेड रस्त्यावरील प्रमुख जिल्हा मार्ग- 84 किमी 0/400 येथील काम सुरु करण्यात येणार आहे. या मार्गावरुन जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस दि. 29 एप्रिल 2022 पर्यंत प्रतिबंध केला आहे. या रस्त्यावरील वाहनास पर्यायी मार्ग म्हणून जड वाहनांसाठी पश्चिम वळन रस्ता श्री खंडेराव होळकर चौक येथून असर्जन मार्गे नांदेड व नाळेश्वर कडे ये-जा करतील. तर दुचाकी, हलके वाहनांसाठी ग्रामीण मार्ग-70 वरुन नोबेल कॉलनी मार्गे नांदेड व नाळेश्वरकडे ये-जा करतील. मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन यांनी याबाबत अधिसूचना निर्गमीत केली आहे.
Related Posts
अनुसूचित विषयक शिवीगाळ करणाऱ्या चौघांना तीन वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकास 23 हजार रुपये रोख दंड
नांदेड(प्रतिनिधी)-अनुसूचित जातीचे लोक मराठ्यांच्या घरी वसुलीसाठी येतात काय असे सांगून एका ऍटो फायनान्स कंपनीच्या कमिशन एजंटला ग्राम पंचायत कार्यालयात कोंडून…
संजय बियाणी हत्याकांडात उज्जैनच्या दोन युवकांना पाच दिवस पोलीस कोठडी
नांदेड(प्रतिनिधी)-संजय बियाणी हत्याकांडात आता अटक आरोपींची संख्या 11 झाली आहे. दिल्ली येथून पकडून आणलेल्या दोन युवकांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.आर.सोवानी यांनी…
चोरीला गेलेला मालट्रक मुखेड पोलीसांच्या ताब्यात ;पाच आरोपीना अटक
मुखेड (प्रतिनिधी)- वर्ताळा तांडा येथून दोन महिन्याखाली चोरीला गेलेला मालट्रक मुखेड पोलिसांनी ताब्यात घेऊन पाच आरोपींना अटक केली. वर्ताळा…