नांदेड,(प्रतिनिधी)- आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन माळावर नेवून दगडाने तिचे डोके फोडून खून केल्याचा प्रकार बोरी (खु) ता.लोहा येथे घडला आहे.या मारेकऱ्याला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे.
सविता मनोहर गुडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पिराजी खंडू टेकाळे रा.बोरी (खु) यांनी आपली पत्नी ज्योती पिराजी टेकाळे वय ३२ हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन २२ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास ज्योतीला बोरी (खु) च्या माळावर नेवून तिच्या डोक्यात दगड टाकून तिचा खून केला आहे.
या तक्रारीवरून माळाकोळी पोलिसांनी गुन्हा क्रमांक १०५/२०२२ भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२,४०८ (अ) नुसार गुन्हा दखल केला आहे.या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक माणिक डोके हे करीत आहेत.