नांदेड(प्रतिनिधी)-येथील ज्येष्ठ पत्रकार संजय एन. कंधारकर यांचे कंधार -लोहा रस्त्यावर झालेल्या दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. मुलाला परीक्षा केंद्रावर सोडल्यानंतर परत येत असताना हा अपघात घडला.
शहरातील आंबेडकरनगर येथील रहिवासी असलेले संजय कंधारकर हे आपल्या मुलाला कंधार येथे परीक्षेसाठी सोडून परत येतांना कंधार – लोहा रस्त्यावर दुचाकीस अज्ञात वाहनाने दिलेल्या जबर धडकेत ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच शहराती ल अनेक पत्रकारांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली. या घटनेमुळे जिल्हा पत्रकार संघटनेने दुःख व्यक्त केले आहे. सदर घटनेबाबत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पत्रकार संजय कंधारकर यांचे अपघातात निधन