पोलीसांनी 7 लाख 4 हजार 611 रुपये परत मिळवून दिले

8 लाख 64 हजार 611 रुपयांची ऑनलाईन फसवणूक
नांदेड(प्रतिनिधी)-विज वितरण कंपनीचे बील भरण्याच्या नावावर असंख्य फसवणूका होत आहेत. जनतेने अशा फसवणूकीच्या कॉलला प्रतिउत्तर देवू नये असे आवाहन पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी केले आहे. नुकताच असा एक प्रकार घडला होता. 8 लाख 64 हजार 611 रुपये ऑनलाईन फसवणूक करुन काढून घेण्यात आले होते. पण नांदेडच्या सायबर पोलीस सेलने केलेल्या मेहनतीला यश आले आणि त्यातील 7 लाख 4 हजार 611 रुपये पोलीसांनी परत मिळवून दिले आहेत. नांदेड जिल्हा पोलीस दलाचे यासाठी कौतुक होत आहे.
जुलै 2022 मध्ये वीज वितरण कंपनीचे बिल भरणेबाबत खोटे संदेश पाठवून लिंक पाठवून कुरीअरने मागिविलेले पार्सल न आल्याने कंपनीच्या ऑनलाईन कस्टमर केअर नंबरची गुगलवर तपासणी केल्यानंतर तो मोबाईल नंबर फॉर्ड असल्याचे माहित झाले आणि त्या नंबरद्वारे 8 लाख 64 हजार 611 रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली होती.
वेगवेगळ्या चार व्यक्तींकडून फसवणूकीच्या घटनेत ठकवले गेलेले 8 लाख 64 हजार 611 रुपये परत मिळविण्यासाठी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक नानासाहेब उबाळे, पोलीस उपनिरिक्षक थोरवे, दळवी, पोलीस अंमलदार राठोड, शेवाळे, स्वामी यांनी सविस्तर माहिती घेवून तात्काळ संबंधीत बॅंक, युपीआय, वॉलेट, मर्चंट यांना मेल करून पाठपुरावा केला. त्यामुळे ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम राखून ठेवण्यात आली, फ्रिज करण्यात आली. त्यातील 7 लाख 4 हजार 611 रुपये परत मिळविण्यात सायबर पोलीस स्टेशनला यश आले आहे. त्यासाठी पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी सायबर टिमचे कौतुक केले आहे.
या माहितीसह पोलीसांनी जनतेला आवाहन केले आहे की, ऑनलाईन फसवणूक झाल्यास सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 या क्रमांकावर संपर्क करा. तसेच संबंधीत पोलीस ठाणे, सायबर पोलीस ठाणे यांना फसवणूकीबाबत माहिती द्या. पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला फोनवर आपल्या बॅंकेचे विवरण देवू नका, कोणताही प्रकारचा ओटीपी सांगू नका, अनोळखी व्यक्तीने दिलेल्या लिंकवर क्लिक करू नका आणि ऑनलाईन कस्टमर केअरचा नंबर शोधतांना संकेतस्थळाची सत्यता तपासूनच व्यवहार करा याद्वारे आपल्याला सायबर क्राईमचा बळी होण्यापासून वाचता येईल.
वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा वाचकांना दरवेळे याबाबत आवाहन करते की, आपला ओटीपी क्रमांक, अनोळखी व्यक्तीशी चर्चा आणि ती बॅंके खात्यासंदर्भाची कधीच करू नका. बातमीत लिहिलेल्या सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांक 1930 ची आठवण ठेवा आणि आपली फसवणूक त्वरीत पोलीसांसमक्ष मांडा तरच आपण या सायबर क्राईमपासून वाचू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *