पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांना जन्मदिनानिमित्त शब्द शुभकामना…

आज 365 पानांच्या पुस्तकाचा पहिला दिवस याच दिवशी नांदेड जिल्ह्याचे भुमिपूत्र, नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांचा जन्मदिन. आज त्यांना मिळालेल्या फुलांचा सुगंध त्यांनी पुढील 364 दिवस टिकवून ठेवावा या एकाच भावनेतून आज त्यांना वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने जन्मदिनाच्या हार्दिक शुभकामना…
नांदेड जिल्ह्यातल्या कलंबर गावातील जन्म घेतलेले अशोक घोरबांड यांनी आता जवळपास 30-31 वर्षाची पोलीस सेवा पुर्ण केली आहे. उर्वरीत 3-4 वर्षाच्या कालखंडात त्यांना भरघोस यश मिळावे हे करत असतांना आपल्या जीवनात आलेल्या फुलांच्या सुगंधाला इतरत्र जोरदारपणे पसरविण्याची ताकत मिळावी आणि त्यांनी अत्यंत सक्षमपणे आपला उर्वरीत पोलीस सेवा काळ पुर्ण करावा या अपेक्षेतूनच त्यांना प्रत्यक्ष न भेटता शब्दरुपात आम्ही शुभकामना व्यक्त करत आहोत.
या शुभकामना व्यक्त करतांना ज्यांनी आम्हाला दु:ख दिले त्यांचे आभार मानण्याची आमची वृत्ती आहे. कारण त्यांच्यामुळे आम्ही मानसिकदृष्ट्या सक्षम बनलो, त्यांचे मोठे योगदान आहे.ज्यांनी आम्हाला धोका दिला त्यांचे सुध्दा आभार मानण्याची आमची वृत्ती आहे. कारण त्यांच्यामुळेच आम्ही शहाणे व्हायला शिकलो. ज्यांनी आम्हाला नकार दिला त्यांना सुध्दा धन्यवाद देण्याची वृत्ती आहे त्यांच्यामुळेच आम्ही संघर्ष करण्यासाठी प्रवृत्त झालो. ज्यांनी आम्हाला सोडल त्यांच्यासाठी पण आम्ही आमच्या मनात चांगली भावना ठेवतो. कारण त्यांच्यामुळेच आत्मनिर्भर बनण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली. ज्यांनी आमचे पाय ओढले त्यांच्यासाठी तर आम्ही नतमस्तक असतोत कारण त्यांनीच आम्हाला मजबुतीने पाय रोवणे शिकवले. या लांबलचक विश्लेषणातून आम्ही चांगलेच लिहित आहोत. हे वाचत असतांना वाचकांनी मात्र या शब्दांचा “ध’ बदलून त्याचा “मा’ करू नये. कारण मराठी भाषा खुप श्रीमंत आहे.
येत्या 364 दिवसांमध्ये आपल्याला जे शब्द स्वाद आवडत नाहीत ते शब्द इतरांना सुध्दा आवडत नसतात ज्याची जाणीव ठेवून अशोक घोरबांड यांनी आपल्या पुढील 364 दिवसांच्या वर्षातील पानांमध्ये सप्तरंगांच्या कुंचल्यातून एक सुंदर प्रतिमा तयार करावी अशी अपेक्षा आहे. जगात कोणतीही वेळ शुभ आणि अशुभ नसते. प्रत्येक माणुस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्व आणून देत असतो. विचारवंत म्हणतात आजच्या बदलत्या युगात वयाप्रमाणे सन्मान मिळत नाही तर तो उत्पन्नावर मिळतो. आमच्याकडे उत्पन्न तर नाहीच म्हणूनही आम्हाला सन्मान मिळाला नसेल पण आपल्याला सन्मान देण्याच्या इच्छेतूनच आम्ही आमच्या लेखणीला झिजवले आहे. आम्ही नेहमी आमच्या जीवनावर विश्र्वास केलेला आहे की, आमचा एक वझीर गेला तरी पण आम्ही तो खेळ हरलो नाहीत कारण आमचा विश्र्वास आहे की, एखादे प्यादे सुध्दा आमच्या खेळाची परिणीती विजयात बदलू शकते. आम्ही स्वत:शी प्रामाणिक आहोत म्हणूनच आम्ही खणखणीत बोलतो असो आपल्याला शुभकामना देतांना जास्त विश्लेषण न करता हे आम्ही सांगू इच्छीतो की, कधी-कधी कमी पणा पण घेत जा, त्यामुळे अनेक माणसे कमावली जातात आणि त्यातून मिळणारी श्रीमंती ही सर्वात मोठी मौल्यवान आहे. नाते सांभाळत असतांना चुका सांभाळून घेण्याची मानसिकता आम्ही बाळगतोच त्याचे परिवर्तन आम्ही कधीच शत्रुतेत केलेले नाही अशी अपेक्षा आपल्याकडून पण आहे. कारण आमच्याकडे येणारी मंडळी आपल्याकडे येणारी मंडळी ही समाजाचा एक भाग आहेत आणि त्या समाजात चांगला संदेश जावा म्हणूनच आम्ही आपल्याला जन्मदिनी शब्द रुपांच्या शुभकामना जाहीर पणे व्यक्त केल्या आहेत.
आम्ही आमच्या जीवनात चालतांना पाऊल, बोलतांना शब्द, बघतांना दृष्य आणि ऐकतांना वाक्य या चार गोष्टी काळजीपुर्वक आचरणात आणल्या आहेत. त्यामुळे आमच्या जीवनात कधीच वादळ निर्माण झालेले नाही. दगडाने डोकेही फुटतात आणि दगडाची मुर्तीपण तयार होते, ज्यावर लोक डोके टेकतात आपल्याला सुध्दा आपल्या जीवनात स्वत: ठरवायचे आहे की, डोके फोडणारा दगड व्हाव की नतमस्तक करणारी मुर्ती. आपण नतमस्तक होणारी मुर्ती व्हा या अपेक्षेतूनच आम्ही आपल्यासाठी जन्मदिनाच्या शुभकामना व्यक्त करत आहोत. जे लोक गुणवंत असतात ते कोणाकडून दबत नाहीत आणि कोणालापण दाबत नाहीत उत्तर देण्यात ते सक्षम असतात पण चिखलात दगड कोण मारावा म्हणून गप्पपण बसतात. यातून आपल्याला कोणत्या जागी उभे राहायचे आहे हे आपण ठरवा. कारण सांभाळून ठेवण ही सुध्दा एक कला आहे. मग ती संपत्ती असेल की, नाते. दोन्ही जागी ही कला वापरता येते. तुम्हाला भेटल्यानंतर वेळेचा पत्ता लागला नाही पाहिजे अशी आपल्या जीवनातील वागणूक असावी या अपेक्षेनेच या जन्मदिनाच्या शुभकामना प्रेषित करीत आहोत.
आपण आज श्रीकृष्णाच्या राज्यातील एक सरदार आहात श्रीकृष्णाला कळत की आपल्या मागे उभी असणारी मंडळी किती प्रामाणिक आहे. भगवंत श्रीकृष्णाच्या जीवनातील अनेक प्रसंग असे आहेत की ज्यामध्ये त्यांनी प्रत्येकाला कोणत्या जागी ठेवावे याची जाणिव ठेवलेली होती. यातील सर्वात उत्कृष्ट उदाहरण श्रीकृष्णाचे परम भक्त उध्दव यांचे आहे. त्यांना असे वाटत होते की, या जगात श्रीकृष्णाचा सर्वात मोठा भक्त मीच आहे. पण श्रीकृष्णांना ही बाब लक्षात आली तेंव्हा त्यांनी एकदा उध्दवला एक पत्र देवून गोकुळ गावात पाठवलं. ते पत्र तेथील गोपीकांसाठी होते. गोपीकांनी केलेली उध्दवाची अवस्था पाहुन जगला हे दिसले की, श्रीकृष्ण आपल्या सोबतच्या माणसांना त्यांचा जागांची खरी जाणीव करून देण्यात सक्षम आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *