नांदेड(प्रतिनिधी)-उमरी ते बिलोली जाणारी बस एका वळणावर अर्धवट कलंडली पण सुदैवाने कोणाची जिवीत हाणी झाली नाही. कुंडलवाडी पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरीकांनी त्या बसमध्ये अडकलेल्या सर्वांना बाहेर काढले आणि उपचार करून पुढील गंतव्याकडे रवाना केले.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज दुपारी उमरी ते बिलोली जाणारी बस क्रमांक एम.एच.20 बी.एल.1903 कुंडलवाडी मार्गे जात असतांना पिंपळगावजवळ त्या बसचे स्टेअरिंग लॉक झाले आणि वळणावर ती बस अर्धवट कलंडली. बसमधील आठ ते 9 लोकांना मुक्का मार लागला. कुंडलवाडी पोलीस प्रशासन आणि स्थानिक नगारीकांनी बसमध्ये अडकलेल्या सर्वांना बाहेर काढले आणि त्यांना अगोदर वैद्यकीय मदत देवून पुढील गंतव्यासाठी रवाना केले.
बस कलंडली सुदैवाने जिवीत हानी नाही