नांदेड(प्रतिनिधी)- महापालिकेच्या जंगमवाडी शाळेत शिक्षण घेणा-या मुलींनी भारतीय युवा खेल परिषदे अंतर्गत नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय मैदानी स्पर्धेतील ६०० मीटर या धावण्याच्या स्पर्धेत या मुलींनी सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत कु. समीक्षा धम्मानंद नरवाडे हिने द्वितीय क्रमांक व कु. आकांक्षा राहुल कदम हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे. या विद्यार्थिनींची काठमांडू, नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. यापूर्वीही या विद्यार्थिनीने राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत प्राविण्य मिळवलेले आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेडचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी या दोन्ही विद्यार्थीनींनी मिळविलेल्या यशाबद्दल कौतुक केले, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या प्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त माननीय श्री गिरीशजी कदम , उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे, शिक्षण विभाग प्रमुख अजितपालसिंह संधू व तसेच मनपाचे शिक्षणाधिकारी राजेश पाताळे साहेब ,शाळेचे मुख्याध्यापक श्री. साबळे सर, मार्गदर्शक श्री. कामठेकर सर व प्रशिक्षक श्री. पांचाळ सर व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. सदरील विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी दिले व उपस्थित सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.