अधार्पूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मालेगाव येथील पत्रकार तथा शिवसेना वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी सुभाशिष कामेवार (वय 35) यांचे दि. 21 डिसेंबर बुधवारी दुपारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या घटनेमुळे मालेगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. सुभाशिष कामेवार यांना बुधवारी सकाळी छातीत दुखत असल्याने नांदेडच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. पत्रकार आणि धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते अशी कामेवार यांची ओळख होती. त्यांच्या पार्थिवावर दि. 22 डिसेंबर गुरुवारी सकाळी 10 वाजता त्यांच्यावर मालेगांव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, तीन बहिणी असा परिवार आहे.
Related Posts
देगलूरमध्ये मावशीच्या घरी चोरी करणारा नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने पकडला
2 लाख 10 हजार रुपये चोरले होते ; 1 लाख 40 हजार जप्त, एक दिवस पोलीस कोठडी नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर येथे आपल्या…
एसजीजीएस नांदेडच्या पराग पाटीलची मायक्रोसॉफ्टमध्ये ५२ लाखांच्या पॅकेजवर निवड
नांदेड,(प्रतिनिधी)- श्री गुरू गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था नांदेडच्या (एसजीजीएस) कम्प्युटर सायन्स विभागातील अंतिम वर्षात शिकत असलेल्या पराग पाटील…
राहुलभाऊ सोनसळे आयोजित भिमगितांच्या कार्यक्रमात अनेकांचा सन्मान
नांदेड(प्रतिनिधी)-धम्मचक्र परिवर्तन दिन विश्र्वरत्न, प्रजासुर्य डॉ.बाबासाहेब अंाबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.आंबेडकरनगर येथे झालेल्या कार्यक्रमात आयोजक राहुलभाऊ सोनसळे यांनी अनेक मान्यवरांचा…