नांदेड,(प्रतिनिधी)-आज दि. २४ डिसेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र मालेगाव ता. अर्धापूर येथे कुटुंब कल्याण चा दुर्बीणद्वारे (लप्रोस्कोपी) शिबीर घेण्यात आले. ४९ महीलांचे दुर्बीण द्वारे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी अर्धापूर डॉ.आकाश देशमुख, डॉ श्रीकांत शिंगरवाड वैद्यकीय अधिकारी मालेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर घेण्यात आले. शिबीरात दुर्बीण द्वारे शस्त्रक्रिया डॉ बेले यांनी केल्या. कुटुंब कल्याण शिबीराचे नियोजन आरोग्य सहायक एस.पाटील, अरुण गादगे, आरोग्य सहाय्यीका श्रीमती कुलकर्णी, आरोग्य सेविका श्रीमती गुंडले, घनसरे पाटील, काळे, खुळे, टीमके आरोग्य कर्मचारी व्यंकटी बकाल, वसंत शिरसे, प्रदीप गायकवाड, बालाजी राऊत व सर्व आशा यांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
Related Posts
नांदेडकरांनो जन आरोग्य योजनेच्या ऑनलाईन कार्डासाठी तात्काळ नोंदणी करा- मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल
नांदेड (जिमाका) – नांदेड जिल्ह्यात एकत्रीत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यासाठी…
गर्भवती महिलांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घ्यावा-मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल
गर्भवतींना पाच हजार रुपये, जिल्ह्यात नोंदणी सुरू नांदेड (जिमाका) – प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ गर्भवती महिलांसाठी उपयुक्त असून, आता त्यांना पाच हजारांचे अनुदान दोन…
राज्य रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत महिला हेल्मेट रॅली संपन्न
नांदेड (प्रतिनिधी ) – राज्य रस्ता सुरक्षा अभियान-2023 हे दिनांक 11 ते 17 जानेवारी 2023 दरम्यान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत…