नांदेड, (प्रतिनिधी)- बेरोजगार उमेदवार / युवक-युवतींसाठी जिल्हा उद्योग केंद्रातील विविध योजनेबाबत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राच्यावतीने गुरुवार 15 सप्टेंबर रोजी सकाळी 12 वा. मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले आहे. शेप स्किल अकॅडमी, नृसिंह मंदिराजवळ कौठा रोड, कौठा, नांदेड येथे जिल्हा उद्योग केंद्राचे लेखापरिक्षक बालाजी जायभाये हे मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील युवक व युवतीनीं या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा.अधिक माहितीसाठी 02462-251674 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे.
Related Posts
संयुक्त राष्ट्रसंघ दिनी संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज राष्ट्रध्वजा समवेत उभारावा
नांदेड (जिमाका) – संयुक्त राष्ट्रसंघ दिन 24 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाचा ध्वज राष्ट्र ध्वजा समवेत उभारण्याबाबत शासन…
रेल्वे अंडर ब्रिज मालटेकडीचे काम सुरु असल्याने वाहतुकीस प्रतिबंध; पर्याय मार्गाचा वापर करण्याबाबत अधिसूचना निर्गमीत
नांदेड, (जिमाका) – रेल्वे अंडर ब्रिज मालटेकडी चे काम सुरु असल्यामुळे बरकत कॉम्पलेक्स ते ग्यानमाता शाळेपुढील रस्त्यापर्यत रेल्वे अंडर ब्रिज…
बोगस गायछाप विक्री करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी
नांदेड(प्रतिनिधी)-बनावट गायछाप तंबाखू विक्री करणाऱ्या दोन जणांना इतवारा पोलीसांनी पकडल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या तक्रारीमध्ये…