नांदेड(प्रतिनिधी)-एक आई आणि त्यांचे पुत्र झरी- नांदेड रस्त्यावरून येत असतांना झरी खदानीजवळ पिस्टलचा धाक दाखवुन 46 हजारांचा ऐवज लुटल्याचा प्रकार घडला आहे.
खुशाल प्रमोसिंह बैस रा.गंगा गोदावरी नगर कौठा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 ऑक्टोबरच्या रात्री 9.30 ते 10 वाजेदरम्यान रात्री 9.30 ते 10 वाजेच्यादरम्यान आपल्या आईसोबत नवरात्रनिमित्त रत्नेश्र्वरी मातेचे दर्शन घेवून परत येत असतांना झरी खदानीजवळ 6 अनोळखी माणसांनी त्यांची दुचाकी आडवून त्यांच्या कनपट्टीला पिस्तुल लावून त्यांना धाक दाखवून त्यांच्या खिशातील मोबाईल, रोख रक्कम, आईच्या गळ्यातील सोन्याचे दागिणे असा 46 हजार रुपयांचा ऐवज लुटला आहे.याबाबत तक्रार आल्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीसांनी 28 नोव्हेंबर रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम 395 नुसार गुन्हा क्रमांक 154/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक रवि बुरकुले यांच्याकडे देण्यात आला आहे.
रत्नेश्र्वरी मातेचे दर्शन घेवून परत येणाऱ्या आई आणि मुलाला लुटले