विरोधकांनी स्वत:च मानसिक आजारपण राज्याला दाखवल-चित्रा वाघ

नांदेड(प्रतिनिधी)-हे राजकारण करण्याची वेळ नाही. आरोग्य हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पण विरोधक यात राजकारण आणून या घटनेमधून ते राजकीय सलाईन घेवून ते राज्यभर वणवा पेटवण्याचे काम करत आहेत. एकंदरीत विरोधकांचे मानसिक आजारपण हे राज्याच्या जनतेला ते दाखवत आहेत याचे मला वाईट वाटत असल्याची खंत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पत्रकारांशी बोलत असतांना व्यक्त केली.
नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा घेतला. त्यांनी अधिष्ठाता, डॉक्टर्स, नर्स आणि रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा केली. घटना घडली ही दुर्देवी आहे. सरकार म्हणून आम्ही त्याची जबाबदारी घेत आहोत. घटना घडल्यानंतर राज्य सरकार ऍक्शन मोडमध्ये आले आहे. एका दिवसात 14 निर्णय घेतले गेले. यात काय त्रुटी आहे त्या संदर्भाने योग्य निर्णय घेतले जातील. याचबरोबर 2800 आणि काही अधिकच्या पदभर्ती संदर्भात न्यायालयीन प्रकरण होते. आता त्याचाही मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारी मुख्यमंत्री यांनी या संदर्भाची आढावा बैठक घेतली आणि आरोग्य यंत्रणेशी संवाद साधला. यात एक कमिटी तयार करण्यात आली असून यामध्ये विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, त्या परिसरातील वैद्यकीय अधिकारी यांची एक कमिटी स्थापन केली. त्यांनी त्यांच्या परिसरातील सर्व शासकीय रुग्णालयांना भेटी देवून त्यात काही कमी आहे काय याची माहिती घेणे.
चित्रा वाघ बोलत असतांना म्हणाल्या की, विष्णुपूरी येथील शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील आयसीयु या विभागात कधीच औषधांचा तुटवडा नव्हता. हे मात्र त्यांनी ठणकावून सांगितले. या रुग्णालयात अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्ण आणले जातात. यावेळी त्यांनी घटना घडल्यादिवशीच्या संदर्भात किती रुग्ण बाहेरून आले आणि या ठिकाणचे किती रुग्ण याचा आकडाही त्यांनी दिला. विरोधी पक्ष सुर लावत आहेत की, तेथे औषधी नव्हती, डॉक्टर्स नव्हते. त्यांना काय माहित. माझ्यानंतरही आता येथे महाशय येणार आहेत. आदित्य ठाकरेंचे नाव न घेता त्या म्हणाल्या. त्यांनी येतांना सोबत डॉक्टर घेवून यावा. मेडिकलमधील ज्यांना माहिती आहे त्यांना सोबत ठेवावे असा सल्लाही त्यांनी दिला. मागील सन 2020 पासूनचा त्यांनी मृत्यू दर सांगितला. दररोज 13 रुग्ण मृत्यू पावतात असेही त्यांनी यावेळी सांगितले. केवळ विरोध येथे येवून स्टंडबाजी करत आहेत. ही राजकारण करण्याची घटना नाही. मागे अडीच वर्ष त्यांच सरकार होत त्यांनी काय दिवे लावले. खा.सुप्रिया सुळेंचे नाव न घेता त्या म्हणाल्या की, मोठ्या ताई येवून गेल्या आणि मोठ्या भपकाऱ्या मारल्या. त्यांच्या काळात भंडारा येथील 11 लहान बालकांचा होरपळून मृत्यू झाला. त्यावेळी त्यांनी आरोग्य मंत्र्यांचा राजीनामा का मागितला नाही असा सवालही त्यांनी केला. आमच सरकार हे फेसबुकवरच सरकार नाही. ते ऍक्शनमोड घेणार सरकार आहे असे त्या यावेळी म्हणाल्या.
विरोधकांकडून आरोग्य यंत्रणेवर सततचा भडीमार करून त्यांच खच्चीकरण करण्याच काम केल जात आहे. यांचदेखील त्यांना भान राहिल नाही हे अत्यंत दुर्देवी आहे. प्रत्येक गोष्टीत विरोधकांकडून राजाकारण केल जात आहे. हे विरोधकांनी कोठे तरी थांबविले पाहिजे. त्यांच मानसिक आजार पण ते राज्याला दाखवत आहेत हे चुकीच आहे असे मत भाजपच्य प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी पत्रकारांशी बोलत असतांना व्यक्त केल. यावेळी भाजपा महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा पुनम पवार, संध्या राठोड यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *