शिवसेनेचे काम घराघरा पर्यंत पोहचवा – संपर्क प्रमुख दिपक शेंडे 

नांदेड,(प्रतिनिधी)-निवडणुका असोत, नसोत पक्ष संघटना वाढीसाठी व गावपातळीवर शिवसेनेचे काम नेण्यासाठी शिवसैनिकांनी एकजुटीने आणि चिकाटीने काम करुन शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कार्याला बळ द्यावे, कोरोनाच्या काळात ज्या ध्येयाने मुख्यमंत्र्यांनी चिकाटीने तसेच जिद्दीने काम केले. त्याच पध्दतीने शिवसैनिकांनी देखील कुणाच्याही टिकाटिप्पणीकडे लक्ष न देता पक्षाची ताकद वाढवून दाखवावी, असे मत नांदेड दक्षिण मतदारसंघाचे संपर्क प्रमुख दिपक शेंडे यांनी येथे व्यक्त केले.
                    गेल्या तीन दिवसांपासून नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि अंगिकृत असलेल्या संघटना यांची तसेच सिडको, हडको, नांदेड दक्षिण शहर शाखा, सोनखेड, विष्णूपुरी आदी ठिकाणी त्यांनी शिवसैनिकांच्या बैठका घेतल्या. या बैठकातून त्यांनी वरील मत व्यक्त करुन शिवसैनिकांना योग्य पध्दतीने मार्गदर्शन केले. निवडणूका असोत, नसोत मात्र पक्ष संघटनेची ताकद वरचेवर वाढविण्याचे काम तुम्हा, आम्हा सर्वांना करायचे आहे. बुथप्रमुख ते शाखाप्रमुख तसेच सर्कल  प्रमुख ते शहरप्रमुख या सर्वांनी कुणाच्याही आदेशाची वाट न पाहता घरात घरात शिवसेनेचे काम पोहंचविण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. गेल्या दोन वर्षात सरकारने केलेल्या वेगवेगळ्या कामांची माहिती तसेच जनसामान्यांच्या योजना घराघरात पोहचविण्यासाठी आता सकारात्मक प्रयत्न करणे गरजेचे आहे, त्यासाठी कंबर कसावी, असे आवाहनही त्यांनी केले.
                       राज्यात माहाविकास आघाडी असताना काँग्रेस विश्वासात न घेता विकास कामांचे श्रेय घेत असल्याने यांनी आगामी महापालिका शिवसेना आपली ताकत दाखवून देईल, मतभेद जरूर असावेत, कारण  मतभेद हे संघटना वाढीसाठी अत्यंत पोषक असून  संघटना जिवंतपणा  असण्याचे लक्षणे आहेत.  मतभेद जरूर असावेत पण मात्र मनभेद असू नयेत.  सर्व मतभेद बाजूला ठेवून संघटना वाढीसाठी एकजुटीने प्रयत्न करा. राज्यात आपले सरकार आहे, अशी भावना सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण करण्याचे काम करा, असेही दिपक शेडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
या बैठकांना शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर, महानगरप्रमुख अशोक पाटील उमरेकर,  शहरप्रमुख तुलजेश यादव, जिल्हा समन्वयक धोंडू पाटील,  सिडकोचे शहरप्रमुख गजानन राजूरवार, भारतीय कामगार सेनेचे सुरेश लोट, श्यामराव वानखेडे, साहेबराव मामीलवाड, निवृती जिंकलवाड, श्याम वानखेडे, शैलेश रावत, अर्जुनसिंह ठाकूर, बिल्लूू यादव, भाया शर्मा, राम चव्हाण,  प्रमोद मेड, व्यंकटेश मामीलवाड, महेश जाकापुरे, उद्धव शिंदे, बालाजी भायेगांवर, नंदू ठोके, नामदेव पुयड, मुरली पुयड, निकीता शहापूरवाड, सरिता बैस, बाबुराव गाडेगांवकर,  सुदामराव बुद्रूक, अच्युत मोरे, उपतालुकाप्रमुख दिघे, सर्कल प्रमुख सुदाम शिंदे आदी उपस्थित होते. या बैठकीत शिवसैनिकांनी आपले मत व्यक्त करुन अडचणी मांडल्या. त्यांच्या सर्व शंकाचे निरासन दिपक शेंडे  यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *