सर्वसामान्य माणसाने दुसऱ्या महिलेशी नाते जोडले तर भादवीचे कलम 494 आणि पोलीसाने जोडले तर काय?

नांदेड(प्रतिनिधी)-सर्वसामान्य माणसाने आपल्या बायकोशिवाय इतर महिलेशी संबंध जोडले तर त्याच्यासाठी भारतीय दंड संहितेमध्ये कलम 494 प्रस्तावित आहे. भारतीय संस्कृतीत आपल्या पत्नीशी एकरुप राहणे ही जबाबदारी देण्यात आलेली आहे. पण हाच प्रकार कोण्या पोलीसाने केला तर त्याच्याविरुध्द कांहीच कार्यवाही होत नाही. एक सोडून दुसऱ्या बायकोने तिसरीला जाब विचारल्याचा प्रकार नांदेड शहरातील पोलीस ठाण्यात घडला. याबाबत मात्र कोणीच काही बोलायला तयार नाही प्रत्येक जण आपल्या हाताची घडी बांधून तोंडावर बोट ठेवत आहेत. एक विचारवंत म्हणतो की, “हापापलेले जीवन मृगजळामागे धावणारे असते, जो समाधानाने जीवन जगतो तेच फुलांच्या गंधाप्रमाणे सुगंधीत असते.’ व्यासपिठावर भाषण देतांना ते आपल्या जीवनात अंमलात आणायचे नसते असे का म्हटले जाते याचा उलघडा या नवनवीन प्रेमप्रकरणांमुळे समोर आला आहे.
एखाद्या सर्वसामान्य माणसाने आपली बायको सोडून इतर कोण्या महिलेसोबत सोबत संबंध प्रस्तापित केले तर पोलीस विभाग त्या व्यक्तीच्या पत्नीकडून आलेल्या तक्रारीवर त्या माणसाविरुध्द भारतीय दंड संहितेचे कलम 494 प्रमाणे गुन्हा दाखल करते. पण हेच काम पोलीसांनी केले तर त्यावर काय? याचे उत्तर कांही सापडत नाही.प्रेमाला वयाचे बंधन नसते. त्यामुळे ते कधीही , कोणासोबतही होवू शकते. त्याला विचार करत बसण्यापेक्षा त्याला अंमलात आणणे अनेकांना महत्वपूर्ण वाटते. जीवनातील सुख हे माणसाच्या अहंकाराची परिक्षा घेते आणि दु:ख त्या माणसाच्या धैर्याची परिक्षा घेते. या दोन्ही परिक्षांमध्ये पास होणारा व्यक्ती हा सफलपणे जीवन जगतो. म्हणतात प्रेम आणि सन्मान ह्या अशा भेट वस्तु आहेत की, ती आपण वाटायला लागलो तर मुके सुध्दा आपल्यासमोर झुकतील. तेंव्हा पोलीसाने वाटलेले प्रेम चुकीचे कुठे असते. शेवटी तो पण माणुसच असतो आणि एक सोडून दोन-चार ज्याने जमवल्या नाहीत त्याची ख्याती होत नाही आणि ही ख्याती प्राप्त करण्यासाठी कोणी असे केले तरी त्यात चुकीचे ते काय?
असाच एक प्रकार नांदेड जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात घडला. त्याचे झाले असे की, त्या पोलीसाच्या तथाकथित दुसऱ्या पत्नीने पोलीस ठाण्यात येवून तिसऱ्या महिलेला जाब विचारला. सोबतच पोलीसाला सुध्दा ती तथाकथीत दुसरी पत्नी भरपूर बोलली पण अखेर हे प्रकरण गुपचुप एका कक्षात गेले आणि त्यानंतर या प्रकरणाबद्दल महात्मा गांधीच्या तीन माकडांप्रमाणे परिस्थिती तयार झाली. महात्मा गांधीची माकडे असे सांगतात की, बुरा मत देखो, बुरा मत कहो, बुरा मत सुनो. पण अशी परिस्थिती तयार केल्याने झाकते काय ? कोंबड्यावर एखादी डाल झाकली तर तो आरवायचा थांबतो काय? असा कोणताही बदल निसर्गाने केलेला नाही. त्यामुळे हे प्रकरण सुध्दा आता नांदेड शहरात आणि नांदेड जिल्ह्यात चर्चेचा विषय झाले आहे. कांही लोक सांगतात त्या तिसऱ्या महिलेने कोणाला विचारतेस असा प्रश्न दुसऱ्या महिलेला विचारला असता तर काय झाले असते. असो पण असे सुरू आहे. तो पोलीस जगाला सांगतो माझ्या सहवासाला कधी महत्व देवू नको कारण तो कांही क्षणांचा असणार आहे. माझ्या देहाला कधी महत्व देवू नका, कारण एक दिवस त्याची राख होणार आहे. महत्व द्यायचे असेल तर ते माझ्या भावनांना द्या कारण त्या जर तुम्हाला समजल्या तर मी सदैव तुमच्या सोबतच असणार आहे. पण अशा व्यक्तींची सोबत कोणाला हवी आहे आणि त्यांच्यासोबत राहुन आपल्या जीवनात त्यांच्या विचाराचा काय परिणाम होईल याची थोडीशी कल्पना जरी कोणाला आली तर लोक कोसभर दुर पळतील. तुमच्या जवळचा प्रत्येक व्यक्ती तुमचा शुभचिंतकच असतो असे नाही. कारण तुमचे शुभ होतांना पाहुन सुध्दा इतरांना चिंता होते याची जाण त्या व्यक्तींनी ठेवण्याची नक्कीच गरज आहे. ज्यांच्याकडे आपल्या पत्नीशिवाय अनेक महिला उपलब्ध आहेत. आम्ही मांडलेला हा एक शब्द प्रपंच नांदेड जिल्ह्यातील जवळपास 4 हजार पोलीसांपैकी एकाचा आहे आम्ही सर्व पोलीस दलाला त्याचा दोष देवू इच्छीत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *