सविता गायकवाड गोळीबार प्रकरणात गोळी मारणाऱ्या युवकास पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-सविता गायकवाड यांच्या बनावट गोळीबार प्रकरणात ज्या युवकाने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यास इतवारा पोलीसांनी आज न्यायालयात हजर केले होते.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी.एस.जाधव यांनी त्यास दोन दिवस अर्थात 4 फेबु्रवारी 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.9 जानेवारी रोजी रात्री 11 वाजेच्यासुमारास बाफना पुलावर माझ्यावर जिवघेणा हल्ला झाला. असा कॉल सविता बाबुराव गायकवाड (44) या महिलेने पोलीसांना केला. पोलीस प्राथमिकीमध्ये त्यांचा व्यवसाय समाजकार्य असा लिहिलेला आहे. त्या तक्रारीनुसार त्यांच्यावर परभणी येथील दोघांनी जीवघेणा हल्ला केल्याची त्यांची तक्रार होती.पोलीसांनी परभणीतील लोकांना ताब्यात घेतल्यानंतर ते त्या वेळेस 9 जानेवारी 2023 रोजी ते आपल्या घरीच अर्थात परभणी येथेच होते. ही बाब सिद्द झाली. त्यानंतर पोलीसांनी सविता गायकवाडचा जबाब घेतला त्यांनी सुध्दा आपल्या जुन्या भांडणातील बदला काढण्यासाठी हा बनाव केल्याचे सांगितले. त्यापैकी किरण सुरेश मोरे (26) यास इतवारा पोलीसांनी 11 जानेवारी रोजी अटक केली. तो 17 जानेवारीपासून न्यायालयीन कोठडीत गेला. त्यानंतर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देणाऱ्या सविता बाबुराव गायकवाड (44) यांना 17 जानेवारी रोजी अटक झाली.19 जानेवारी रोजी त्यांना न्यायालयात पाठविण्यात आले.
याप्रकरणातील आणखी दोन आरोपी फरार होते. त्यात एक गोपीनाथ बालाजी मुंगल(33) यास इतवारा पोलीसांनी काल 1 फेबु्रवारी रोजी अटक केली. ज्या पिस्टलमधून सविता गायकवाडवर गोळी झाडण्यात आली ते पिस्टल गोपीनाथ मुंगलकडेच आहे आणि ते जप्त करायचे आहे या युक्तीवादासह पोलीस उपनिरिक्षक शेख असद यांनी गोपीनाथ मुंगलला 4 दिवस पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती केली. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश पी.एस. जाधव यांनी गोपीनाथ मुंगलला अर्थात 4 फेबु्रवारी 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *