नांदेड (प्रतिनिधी)-स्वाधार योजनेसह विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दि. 21 रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फुले, शाहु, आंबेडकर विद्यार्थी कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिरी अभिजीत राऊत यांना निवेदन देण्यात आले. स्वाधार योजना आणि भारत सरकार शिष्यवृत्ती सन 2020 ते 2023 या शैक्षणिक वर्षातील स्वाधार योजनतील रक्कम अद्यापही विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यातवर जमा झाली नाही. तसेच महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांचे कागदपत्रे टि.सी, मार्कमेमो महाविद्यालयाकडून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. प्रशासनाचे याक डे लक्ष वेधण्यासाठी फुले, शाहु, आंबेडकर विद्यार्थी कृती समितीच्या वतीने दि. 21 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. भारत सरकार शिष्यवृत्ती रक्कमेत महागाई भत्यानुसार वाढ करण्यात यावे, स्वाधार योजनेची तालुका स्तरावर तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावे, योजनेची 50 टक्केची जाचक अट रद्द करून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना देण्यात यावी, भारत सरकार शिष्यवृत्ती हे शैक्षणिक वर्षे संपविण्यापूर्वी विद्यार्थ्यांची रक्कम करण्यात यावी, भारत सरकार शिष्यवृत्ती अभावी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रेसाठी अडवणूक केली जात आहे यावर आळा घालावा, भारत सरकार शिष्यवृत्ती व स्वाधार योजना व इतर शिष्यवृत्ती वजेट वाढविण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
Related Posts
विष्णुपूरी ग्राम पंचायतीने 350 जणांना दिला गाव नमुना क्रमांक 8
वास्तव न्युज लाईव्हच्या बातमीचा इफेक्ट नांदेड(प्रतिनिधी)-27 सप्टेंबर रोजी वास्तव न्युज लाईव्हने प्रसिध्द केलेल्या वृत्ताची दखल घेत ग्राम पंचायत विष्णुपूरीने जवळपास…
दीड वर्षापासून बेपत्ता असलेल्या बालिकेला नांदेड पोलीसांनी शोधून तिच्या आई-वडीलांच्या स्वाधीन केले
नांदेड(प्रतिनिधी)-दीड वर्षापासून घरातून बेपत्ता असलेल्या मुलीचा शोध घेण्यात नांदेड येथील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाला यश आले असून ही 22…
शिक्षकाची ऑनलाईन 93 हजारांची फसवणूक
नांदेड(प्रतिनिधी)-एका शिक्षकाची फसवणूक करून ठकसेनांनी त्यांच्या खात्यातून 93 हजार 375 रुपये काढून घेतले आहेत. शिक्षक असलेले अनंत रामचरण वर्मा यांनी…