नांदेड(प्रतिनिधी)-स्वर्गीय गंगाधररावजी पांपटवार जयंती महोत्सव समिती, टीचर्स क्लब रुग्णालय व स्वर्गीय गंगाधररावजी पांपटवार वैद्यकीय सहकारी संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनाच्या औचित्याने जीवनगौरव पुरस्कार घोषित करण्यात आले असून शिक्षण, वैद्यकीय, साहित्य, समाजसेवा, उद्योग, पत्रकारिता, कला, लेखन, प्रकाशन या प्रकारातील जीवनगौरव पुरस्कार देण्यात येत आहेत. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे.
यावर्षीचा शैक्षणिक कार्यासाठीचा जीवनगौरव पुरस्कार एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू अंकुशराव कदम, सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार व्यंकटराव पाटील गोजेगावकर माजी शिक्षण सभापती, जिल्हा परिषद नांदेड, वैद्यकीय क्षेत्राचा पुरस्कार माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे, ज्येष्ठ हृदय रोगतज्ज्ञ नांदेड, पत्रकारिता- विजय जोशी दैनिक सामना, समाजसेवा- शेख अब्दुल शेख अमीर सेवानिवृत्त पोलीस, उद्योग- श्रीराम मेडेवार, कला- स्वर्गीय सुभाष वसेकर (मर्णोप्रांत), प्राथमिक शिक्षक एस. एन. ढवळे गुरुजी, कृषी- भगवानराव इंगोले, प्रकाशन- दत्ता डांगे इसाप प्रकाशन नांदेड यांची निवड करण्यात आली आहे.
कुसुम सभागृह नांदेड येथे शुक्रवार, दि. १५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता होणाऱ्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री जयंत पाटील, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बालाजी कल्याणकर, माजी मंत्री माधवराव पाटील किनाळकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, उद्योग मंत्रालयाचे ओएसडी प्रशांत रुमाले, प्रमुख वक्ते डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी नागपूर, ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक तथा विचारवंत यांची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे गजानन पांपटवार, सचिव सौ. अंजली पांपटवार, संचालक प्रा. डी.बी. जांभरूणकर, डॉ. राम वाघमारे, नामदेव चव्हाण, बालाजी पांपटवर, सूर्यकांत कावळे, सूर्यकांत गायकवाड, प्रकाश धुप्पे, अनिल वट्टमवार, डॉ. मानसी इंदूरकर, डॉ. दीपाली राजेंगोरे, डॉ. विश्वजीत पाटील, डॉ. पल्लवी सातभाई, डॉ. सविता पाटील, गोपाळराव पेंडकर, विजय चालीकवार, राजेश यादव, संगमेश्वर कानगुले, रंगनाथ कांबळे यांनी केले आहे.