नांदेड(प्रतिनिधी)-डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या शाळा प्रवेश दिनानिमित्त ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता कुसुम सभागृहात भीम महोत्सव होणार आहे..डॉ.बाबासाहेब शाळेत गेले तेव्हाच या देशात खऱ्या क्रांतीची सुरुवात झाली. त्यांच्या शिक्षणातून या देशाच्या संविधानाची व अर्थव्यवस्थेची निर्मिती झाली. बहुजनांच्या कोटी कोटी कुळांचा उध्दार झाला. या ऐतिहासिक भीम महोत्सवाचे उद्घाटन आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष कामाजी पवार, प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, डॉ. सिध्दार्थ जोंधळे, बालाजी इबितदार, अजय तुरेराव, शेखर घुंगरवार, शंकर शिंगे, स्वागताध्यक्ष डॉ. दिनेश निखाते, अनिल बोरीकर उपस्थित राहणार आहेत. भीमशाहीर मेघानंद जाधव प्रस्तुत परिवर्तनाचा वादळवारा, आंबेडकरी रॅपर विपीन तातड, बाल रॅपर स्वरुप डांगळे, कवी, गीतकार सचिन डांगळे यांचा कार्यक्रमही होणार आहे. सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रात काम करणाऱ्या आंबेडकरी विचारधारेच्या निष्ठावंतांचा गौरव ही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक प्रा. प्रबुध्द रमेश चित्ते, विशाल बोरगावकर, नितीन एंगडे, कुणाल भुजबळ, अंकुश सावते, लक्ष्मण वाठोरे, अविनाश गायकवाड, सोहन वंदने, मनोज भरणे, अतुल गवारे, हर्षवर्धन लोकडे, नागराज भद्रे, संदेश वाघमारे, अक्षय गायकवाड, इंजि. प्रशित चित्ते, शुभम खंदारे, भीमसेन पांगरेकर, योगेश केकाटे यांनी केले आहे.
Related Posts
बिल्डरने दिली फाटक्या नेत्याला जुगार अड्ड्याची सुपारी आणि स्वत: केला नदीपलीकडे जुगार अड्डा सुरू
नांदेड(प्रतिनिधी)- काही फाटक्या राजकीय नेत्यांनी अर्ज करून पैसे कमावण्याचा एक नवीन धंदा सुरू केला आहे. अर्वाचिन काळापासून सुध्दा अवैध धंदे…
महिला ग्रामसेविकेसोबत जातीय द्वेष करणाऱ्या 26 हंबर्डेवर ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल
हंबर्डेने हंबर्डेचे रेकॉर्डींग ग्रामसेवक महिलेला दिले नांदेड(प्रतिनिधी)-एका हंबर्डेने दुसऱ्या हंबर्डेशी बोललेले कॉल रेकॉर्डींग अनुसूचित जातीच्या महिला ग्रामसेवकाला दिल्यानंतर त्यात ग्रामसेविकेबद्दल…
मालपाणी मतिमंद विद्यालयात मेंदूविकार शिबिराच्या नाव नोंदणीस प्रारंभ
नांदेड(प्रतिनिधी)-मेंदूचे विकार असणाऱ्या रुग्णांसाठी वरदान ठरत असलेल्या मेंदूचे विकार असणाऱ्या 18 वर्षाआतील मुला-मुलीकरीता येथील मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद…