25 ऑगस्ट रोजी शहरात शुध्द शाकाहारी हॉटेल चतुर्थीचे उद्‌घाटन

नांदेड(प्रतिनिधी)-खव्वयांना परवणी ठरणारी हॉटेल चतुर्थी ही एक शुध्द शाकाहारी हॉटेल शुक्रवार दि.25 ऑगस्ट रोजी सुरू होत आहे. या हॉटेलच्या भागिदारांनी आम्ही खव्वयांसाठी सर्वोत्कृष्ट सेवा देणार असल्याचा विश्र्वास व्यक्त केला आहे. या हॉटेलचे उद्‌घाटन गुरूद्वारा लंगर साहिबचे जत्थेदार संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते होणार आहे.
शहरातील लोकमित्रनगर, कॅनॉल रोड येथे हॉटेल चतुर्थी नावाची एक हॉटेल आणि सोबत एक समारोह सभागृह 25 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. या हॉटेलची सजावट पाहिली तर पंचतारांकित असल्याची जाणिव होते. या हॉटेलमध्ये पुर्णपणे शुध्द शाकाहारी भोजनाची सोय आहे. त्यासाठी अनेक मेनु तयार आहेत. अत्यंत साफसफाई राखून भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी ही हॉटेल चतुर्थी खव्वयांसाठी परवणी ठरणार आहे.
या हॉटेलचे भागिदार योगेश मधुकरराव पावडे, मोहन दादाराव देशमुख, अविनाश प्रकाशराव पाटील, दिगंबर किशनराव पावडे, भाऊसाहेब विठ्ठलराव पावडे, स.सुखविंदरसिंघ जनरेलसिंघ उप्पाल आणि स.गुरदिपसिंघ हरजितसिंघ कालरा यांनी वास्तव न्युज लाईव्ह सोबत बोलतांना सांगितले की, आमच्या हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे समाधान करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर ठेवणार नाही. हॉटेल व्यवसायात वेगवेगळ्या तयारीने उद्योजक उतरत आहेत. नांदेडमधील नागरीक या हॉटेेल चतुर्थीला आणि त्यातील सेवांना प्रतिसाद देतील असा विश्र्वास भागिदारांनी व्यक्त केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *