नांदेड (प्रतिनिधी)-देगलूर येथे डॉक्टरांकडून माहिती अधिकार कायद्याच्या नावाखाली पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन जणांना देगलूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमितसिंह मोहने यांनी 3 दिवस अर्थात 18 जून 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांच्या सुचनेप्रमाणे देगलूरचे पोलीस निरिक्षक सोहन माछरे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, अशा पध्दतनी कोणी खंडणी मागत असेल तर त्यांनी पोलीस ठाण्यात येवून तक्रार द्यावी.
देगलूर येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ.शिवशंकर शिवदास वलांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार देगलूर येथील आकाश विठ्ठलराव देशमुख आणि त्याचा मित्र सुगत केरुरकर या दोघांनी देगलूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.सचिन रावीकर, डॉ.संभाजी पाटील, डॉ.आर.एच.शेख यांच्या बद्दल माहिती अधिकारात माहिती न मागणे, वरिष्ठांकडे दंडात्मक कार्यवाहीसाठी पत्र व्यवहार न करणे आणि उपोषणास न बसणे यासाठी 10 लाखांची खंडणी मागितली. नंतर खंडणी कमी करून ती 5 लाख रुपयांवर आली. याबाबत तक्रार दिल्यानंतर देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि एकाला अटक करण्यात आली. याबाबतचे वृत्त वास्तव न्युज लाईव्हने आज सकाळीच प्रसिध्द केले होते.
पोलीस उपहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, देगलूरचे पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक सोहन माछरे, सहाय्यक पोलीस निरिक्षक आनंद माळाळे, पोलीस अंमलदार कृष्णा तलवारे, संजय येमलवाड, नामदेव मोरे आदींनी दुसरा आरोपी सुगत रमेश केरुरकर (29) यास सुध्दा पकडले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमितसिंह मोहने यांनी दोघांना तीन दिवस अर्थात 18 जून 2022पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यारंनी दिलेल्या सुचनेप्रमाणे कोणत्याही शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचारी यांना माहितीच्या अधिकाराखाली कोणी माहिती घेवून खंडणी मागत असेल तर अशा व्यतींनी पोलीस ठाण्यात येवून तक्रार द्यावी त्यांना योग्य सहकार्य करण्यात येईल असे आवाहन देगलूरचे पोलीस निरिक्षक सोहन माछरे यांनी केले आहे.
देगलूरच्या डॉक्टरांना खंडणी माघणारे दोघे पोलीस कोठडी