
नांदेड(प्रतिनिधी)-राज्यात झालेल्या सत्ता बदलानंतर कांही लोकांनी शासनाच्या स्थगन आदेशावर आसुरी आनंद व्यक्त केला. माझ्या मते ज्या कामांना स्थगिती देण्यात आली. ती कामे पुर्ण करून घ्या आणि श्रेयसुध्दा तुम्हीच घ्या अशा शब्दात नांदेडचे माजी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर नांदेडचे माजी पालकमंत्री अशोक चव्हाण नांदेडला आले आणि पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी त्यांच्यासोबत महापौर जयश्री पावडे, जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, मारोतराव कवळे गुरूजी माजी मंत्री डी.पी.सावंत, ओप्रकाश पोकर्णा आणि मुन्तजिबोद्दीन यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले, सत्ता मिळाली त्यांनतर ती सत्ता उपभोगाचे साधन नव्हे तर ते विकास कामे करण्यासाठी मिळालेली संधी आहे. नवीन आलेल्या शासनाला स्थगिती शासन असे नाव मिळू नये यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. राज्यात कांही कामांना स्थगिती मिळाली हे खरे आहे पण त्या स्थगितीचा आसुरी आनंद घेणाऱ्यांनी ती कामे पुर्ण करून घेण्यात जास्त रस दाखवावा आणि ती कामे पुर्ण झाल्यावर त्याचे श्रेय सुध्दा त्यांनीच घ्यावे मला त्याचे कोणतेही श्रेय नको आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. मला कोणावरही टिका करण्यात स्वारस्य नाही. ज्यांच्याकडे नवीन सरकारमध्ये पदे येतील त्यांनी राज्यातील तसेच नांदेड जिल्ह्यातील विकास कामांवर खंड पडू देवू नये अशी माझी अपेक्षा आहे.
नवीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात भाषण करतांना आम्ही विरोधक आहोत पण शत्रु नाहीत अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आपल्या शब्दांनाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांनी पुर्ण करावेत अशी माझी अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीसाचे हे वाक्य सकारात्मक आहे आणि मी सुध्दा सकारात्मक राजकारणाचाच विचार करतो.
गेल्या अडीच वर्षात नांदेड जिल्ह्यासाठी आपण केलेल्या कामांची सविस्तर माहिती सांगतांना अशोक चव्हाण यांनी असंख्य बाबी सांगितल्या. त्यामध्ये महत्वपुर्ण बाब अशी आहे की, एशियन डेव्हलपमेंट बॅंकेकडून राज्यासाठी 5 हजार 789 कोटी रुपये येणार आहेत. त्यात नांदेड ते बासर हा 100 किलो मिटरचा रस्ता तयार करण्यासाठी 1 हजार कोटी रुपये मिळणार आहेत. राज्यात असे विकास कामांचे निधी उपलब्ध करतांना ते काही सहज मिळत नसतात. त्यासाठी अनेक जागी बोलावे लागते, तेथून निधी मिळवावा लागतो. तो निधी प्रत्यक्ष काम होईपर्यंत देखरेख करावा लागतो आणि ही सर्व कामे अनेक विकास कामांसाठी मी पुर्ण केलेली आहेत फक्त त्याला स्थगिती मिळू नये एवढीच अपेक्षा आहे.
औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर या विषयावर पत्रकारांनी विचारले असता. अशोक चव्हाण म्हणाले हा निर्णय मंत्रीमंडळाचा आहे. याबद्दल पुढे बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले ईतिहासाप्रमाणे संभाजी राजांची हत्या अत्यंत कु्ररपणे करण्यात आली होती हे विसरता येणार नाही. परंतू औरंगाबादला हिंदु मुस्लिम या दृष्टीकोणातून न पाहता सामाजिक दृष्टीकोणातून पाहण्याची आवश्यकता आहे. नवीन शासनाच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस कॉंग्रेसची सात मते फुटलेली आहेत. जबाबदार व्यक्तींवर कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. विश्र्वासदर्शक ठराव्याच्यावेळी मी सभागृहात पोहचलो नाही तो मला उशीर झाला होता म्हणून. नवीन पालकमंत्री पद बालाजी कल्याणकर यांना मिळाले तर तो त्यांच्या कामाला मिळालेला न्याय असेल असे उत्तर दिले.