ऍटोमध्ये विसरलेला महिला पोलीसाचा मोबाईल परत

नांदेड(प्रतिनिधी)-एका महिला पोलीसाचा ऍटोमध्ये विसरलेला मोबाईल रिक्षा चालकाने शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर यांच्या हस्ते त्या महिला पोलीसाला परत दिला. ऍटो चालकांना सुध्दा आपल्या प्रवाशांची किती चिंता आहे. याची प्रचिती या घटनेवरुन येते.
आज भाग्यनगर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार रमाबाई प्रदिप निवडंगे या ऍटो रिक्षा क्रमांक एम.एच.26 बी.डी.1969 मध्ये बसून पावडेवाडी नाक्याजवळच्या दवाखान्यात गेल्या होत्या. घाई-गडबडीत त्या आपला मोबाईल रिक्षातच विसरल्या. त्या रिक्षाचे चालक मालक शेख मुस्तकीम(गुड्डू) हे होते.शेख मुस्तकीम(गुड्डू) हे टायगर ऍटो रिक्षा संघटनेचे सदस्य आहेत. घडलेला प्रकार त्यांनी संघटनेचे अध्यक्ष अहेमद (बाबा) यांना सांगितला. त्यानंतर पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर यांच्याशी संपर्क साधून ऍटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अहेमद (बाबा) बागवाले, मोहम्मद साबेर आणि रिक्षा चालक, मालक शेख मुस्तकीम या सर्वांनी महिला पोलीस अंमलदार रमाबाई प्रदीप निवडंगे यांचा 14 हजार रुपये किंमतीचा मोबाईल त्यांना परत केला. महिला पोलीस अंमलदाराने ऍटो रिक्षा चालक आणि मालक आणि संघटनेचे धन्यवाद व्यक्त केले आहे.
ऍटो चालवतांना सुध्दा आपल्याला आपल्या कामाशी इमानदारी ठेवली पाहिजे त्यात कोणत्याही प्रकारचा लोभ यायला नको ही बाब ऍटो रिक्षा चालक शेख मुस्तकीम(गुड्डू) यांनी पुर्ण करून समाजासमोर एक आदर्श तयार केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *