नांदेड(प्रतिनिधी)-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तांदुळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असतांना अर्धापूर पोलीसांनी पकडले आहे. 12 लाख रुपयांचा तांदुळ आणि 24 लाख रुपये किंमतीचे दोन ट्रक असा 36 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
7 सप्टेंबर रोजी मद्यरात्री अर्धापूर पोलीस गस्त करत असतांना भोकर फाट्याजवळ त्यांना ट्रक क्रमांक जी.जे.25 यु.9417 आणि जी.जे.36 टी.4411 या ट्रकची तपासणी केली तेंव्हा त्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा तांदुळ भरलेला होता. पोलीसंानी आपल्या प्राथमिकीमध्ये ट्रक चालक आणि मालक हे गुन्हेगार आहेत असे लिहिले आहे. या प्रकरणाची तक्रार पोलीस उपनिरिक्षक शिवाजी माधवराव वड यांनी दिली आहे. या गुन्ह्यात वेज्या बालुभाऊ मारु (19), सुनिलभाई करसनभाई कोरीया (25) रा.पोरबंदर गुजरात यांची नावे लिहिलेली आहेत. या गुन्ह्याचा तपास अर्धापूरचे पोलीस निरिक्षक अशोक जाधव हे करीत आहेत.
काळ्या बाजारात जाणारे तांदळाचे गुजरात राज्यातील दोन ट्रक पकडले