कृष्णूर एमआयडीसीत महादेव मंदिराची विटंबना करणारे तीन गजाआड

नांदेड(प्रतिनिधी)-कृष्णूर एमआयडीसी परिसरातील एका महादेव मंदिरातील महादेव पिंड उखरून चोरी करण्याच्या उद्देशाने महादेवाची विटंबना केल्याप्रकरणी कुंटूर पोलीसांनी माहिती मिळाल्यानंतर काही तासातच तीन गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. याप्रकरणात गुप्त धन शोधण्याचा हा प्रकार असल्याचे बोलल्या जाते.
8 सप्टेंबरला दिवस उजाडल्यानंतर मौजे कुष्णूर एमआयडीसी शंकर महाजन यांच्या शेतातील हेमाडपंथी महादेव मंदिरातील भगवान महादेवाची दगडाची पिंड उखरून त्या खाली दीड फुटाचा खड्डा खोदलेला प्रकार समोर आला. याबाबत वेगवेगळ्या चर्चा होवू लागल्या. पुढे रघुनाथ दिगंबर कमठेवाड यांच्या तक्रारीवरुन कुंटूर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 158/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 379, 295, 511 नुसार दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक संजय अटकोरे यांच्याकडे देण्यात आला. घडलेला प्रकार अत्यंत गंभीर होता. भगवान महादेवाच्या पिंडीची विटंबना झाली होती. कृष्णूर गावातील काही लोक सांगतात हा प्रकार म्हणजे गुप्त धन शोधण्याचा खटाटोप आहे. बिलोलीचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात कुंटूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक महादेव पुरी, पोलीस उपनिरिक्षक दिनेश येवले, पोलीस अंमलदार रमेश निखाते, संतोष कुमरे, लक्ष्मण सोनकांबळे, मोहन कंधारे, अशोक घुमे, रामेश्र्वर पाटील आणि गृहरक्षक दलाचे जवान यश यांची दोन पथके तयार करून आरोपी शोधले.
महादेव मंदिरातील हा सर्व प्रकार विष्णु आनंतराव डुकरे (32) धंदा मोटार मेकॅनिक रा.पिंपळगाव कोरका ता.जि.नांदेड, बालाजी बापू इरपे (32) धंदा शेती रा.बरबडा ता.नायगाव जि.नांदेड आणि अशोक विठ्ठल मैसनवाड (45) रा.बरबडा यांनी केलेला आहे. या तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे आदींनी कुंटूर पोलीसांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *