नांदेड(प्रतिनिधी)-भोकर येथे एक घर फोडून चोरट्यांनी घरमालक व किरायादाराच्या घरातून 42 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरला आहे. हिंगोली ते नांदेड बस प्रवास करतांना एका महिलेच्या बॅगमधून 14 तोळे सोने किंमत 4 लाख 18 हजार 480 रुपयांचे चोरीला गेले आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी चोरीला गेली आहे. एका धाब्याजवळून एका व्यक्तीचा 57 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
अर्चना अशोक बंडे रा.वसंतनगर नांदेड या 7 सप्टेंबर रोजी हिंगोली ते नांदेड असा प्रवास करून एस.टी.बसमध्ये आल्या. ही बस कंधार आगाराची होती. या बसमधून त्या महाराणा प्रताप चौकात उतरल्या. उतरल्यावर त्यांच्या लक्षात आले की, बॅगमधील 14 तोळे सोन्याचे दागिणे किंमत 4 लाख 18 हजार 480 रुपयांचे कोणी तरी चोरून नेले आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरिक्षक जाधव करीत आहेत.
मदनसिंह सावलसिंह राजपुरोहित हे राजस्थान येथील व्यक्ती भोकर रस्त्यावर महादेव खेतेश्र्वर नावाचा धाबा चालवतात. 8 सप्टेंबर रोजी सकाळी 4 वाजता ते झोपले असतांना तेथे दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.डब्ल्यू.7849 वर बसून तिन जण आले. त्यांनी आपल्या उशीरखाली ठेवलेले 21 हजार रुपये रोख रक्कम व एक मोबाईल 36 हजार रुपये किंमतीचा असा 57 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी भोकर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 348/2022 दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार लक्षटवार हे करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गंगाप्रसाद गोपाल नरवाडे यांची एम.एच.26 ए.एन.4003 ही 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी हडकोमधून 19-20 ऑगस्टच्या रात्री चोरीला गेली आहे. याप्रकरणाचा गुन्हा 8 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार शिंदे अधिक तपास करीत आहेत.
भोकर येथील अनिता देवानंद सिलमाने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर दरम्यान त्यांचे कुटूंबिय आणि घरमालकाचे कुटूंबिय लक्ष्मी सणानिमित्त बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेवून चोरट्यांनी अनिता सिलमाने आणि घरमालक अशा दोघांचे घर फोडले. त्यातून सोन्या-चांदीचे दागिणे व रोख रक्कम असा 42 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला. भोकर पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 349/2022 दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार लक्षटवार हे करीत आहेत.
महिलेचे 4 लाख 18 हजार 480 रुपये किंमतीचे 14 तोळे सोन्याचे दागिणे चोरले