नांदेड(प्रतिनिधी)-एका 34 वर्षीय इसमाचा दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार वाशी शिवार ता.हिमायतनगर येथे घडला आहे.
विकास उर्फ बालाजी लक्ष्मण तोटेवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 सप्टेंबरच्या दुपारी 3 वाजेच्यापुर्वी त्यांचे भाऊ पांडूरंग लक्ष्मण तोटेवाड यांचा परमेश्र्वर लक्ष्मण अकलवाड, रमेश लक्ष्मण अकलवाड, लक्ष्मण अकलवाड आणि लक्ष्मीबाई अकलवाड या चौघांनी मिळून जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांचा दगडाने ठेचून खून केला. याप्रकरणी हिमायतनगर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 34 नुसार गुन्हा क्रमांक 206/2022 दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक महाजन यांच्याकडे देण्यात आला आहे.
34 वर्षीय इसमाचा दगडाने ठेचून खून