नांदेड (प्रतिनिधी) – गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकुण 166 बाधित गावात सद्यस्थितीत 1 हजार 982 गाय वर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे. आजवर 74 पशुधन मृत्यूमुखी पडले आहेत. प्रशासनाने बाधित गावासह पाच किमी परिघातील इतर 822 गावांवर विशेष लक्ष दिले असून लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. सद्यस्थितीत 4 लाख 19 हजार 183 प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. मृत्त पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या 31 वर पोहचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी केले.
Related Posts
“देवी सरस्वतीचा फोटो शाळेतून हटवणार नाही” देवेंद्र गरजले. का ?
सावित्रीबाईंनी, देवी सरस्वतीचा आपल्या पुस्तकात उल्लेख करून स्तुती केलेली आहे असे दिसते ते मान्य. पण नंतरच्या काळात सनातनी धर्मातील अनेक…
26 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली युवती सापडेना
नांदेड (प्रतिनिधी)- लोहा तालुक्यातून हरवलेल्या एका युवतीचा शोध 26 दिवसांपासून लागला नसल्याने युवतीच्या कुटूबियांना होणाऱ्या त्रासातून कोण त्यांना वाचवेल असा…
भीमघाट येथे 1 ऑगस्ट रोजी सुद्धा माजविली गेली होती दहशत
नांदेड (प्रतिनिधी)- 1 ऑगस्ट रोजी सुद्धा भीमघाट परिसरात झालेल्या भांडणाप्रकरणी दहा जणांनी एका व्यक्तीला मारहाण करून ऑटोचा काच फोडला होता.…