नांदेड(प्रतिनिधी)-छत्रपती चौकात मटका जुगाराचे माहेर घर असतांना नवीन आलेले भारीचे पोलीस निरिक्षक फेविस्टीक पकडत आहेत. खरे तर फेविस्टीक ही तुटलेल्या वस्ती चिटकविण्यासाठी कामी येणारी वस्तु आहे. कोणी त्याचा वापर गैर मार्गाने करत असेल तरी तो खुप कमी असेल. पण मटक्याचा धंदा जोरात सुरू असतांना त्यावर कार्यवाही झालेली नाही. छत्रपती चौकात एकाच इमारतीत 4 मटक्याच्या बुक्या आहेत.
मटका हा जुगार नवीन नाही. त्यामुळे गरीब युवकांना रोजगार मिळतो. काहींना श्रीमंती असतांना त्यांची श्रीमंती वाढते. आपल्या श्रीमंतीचा हिस्सा ते बऱ्याच लोकांना वाटतात त्यामुळे ते सुध्दा त्यांच्यावर खुश असतात. परंतू सर्वसामान्य माणुस या जुगारात आपले रोजचे कमावलेले पैसे लावतो आणि भिकेला लागतो. या मटका जुगारांमध्ये काही मंडळी लाखांचे आकडे लावतात. परंतू ते कधीच रेड करणाऱ्यांना भेटलेले नाहीत. हा एक मोठा गमतीदार विषय आहे. कारण लाखांचे आकडे लावणारे वातानुकूलीत कक्षात बसून ते आकडे लावतात आणि ती देवाण-घेवाण होते. परंतू रस्त्यावर जुगार लावणारे हे गरीब लोकच असतात. आपल्या नशीबाच्या भरोशावर जुगाराच्या नादात रोजच्या जेवनाचे पैसे ते मटक्यावर लावून जास्त पैसे येतील या आशेवर जगत असतात. परंतू जास्त पैसे कधी येत नाहीत त्यांचीच वाट लागते.
यामध्ये भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छत्रपती चौक मटक्यांचे माहेर घर आहे. कारण मटका एक परंतू बुक्या अनेक म्हणून मटक्यांचा धंदा त्या भागात जास्त जोरात आहे. एकाच इमारतीत चार मटक्याच्या बुक्या आहेत तरी त्या कोणाच्या नजरेत येत नाहीत.
शासनाने सार्वजनिक ठिकाणी सिगरेट पिण्यावर बंदी आणली. सोबतच एक सिगरेट विकायची नाही असाही नियम आहे. नियम चांगला आहे. परंतू ज्यांना सवय आले त्यांचे काय? अनेक जण सिगरेट पण पितात मग छोट्या-छोट्या दुकानदारांवर कार्यवाही करून काय मिळवणार. फेविस्टीक, सुगंधीत तंबाखु, सिगरेट याचे धाऊक विक्रेते रेड करणाऱ्यांना माहित नाहीत काय? त्यांना बंद करावे म्हणजे छोटे दुकानदार विकणारच नाहीत आणि आजच्या छोट्या-छोट्या रेडमधून बातम्या छापून आल्यानंतर मोदकांचा आकडा किती वाढेल हा विषय कोण समजून घेईल.
वाचकांच्या सोयीसाठी मटक्याच्या आड्यांचा व्हिडीओ लावला आहे.
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेविस्टीकवर कार्यवाही आणि मटका जुगाराचे अड्डे सुरूच