नांदेड(प्रतिनिधी)-मगनपुरा भागात एक नाली खोदण्याच्या कामाच्यावेळी स्थानिक नागरीकांनी विरोध केल्यानंतर नागरीकांनी मनपाच्या लोकांशी धक्काबुक्की केली. त्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्तलिहिपर्यंत पुर्ण झाली नव्हती.
उपायुक्त दिलीप टाकळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मगनपुरा भागात प्रस्तावित नालीचे खोदकाम सुरू असतांना नागरीकांनी त्यास विरोध केला. त्यावेळी अतिक्रमण पथक प्रमुख गणेश शिंगे, त्यांचे सहकारी आणि इतर कामगार हजर होते. हा प्रकार दुपारी 3 वाजेच्यासुमारास घडला. महानगरपालिकेच्या पथकाला मदत करण्यासाठी शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक मोहन भोसले आणि त्यांचे सहकारी आले. परंतू नागरीकांनी मनपाच्या लोकांसोबत केलेल्या धक्काबुक्की प्रकरणी वृत्तलिहिपर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.
संबंधीत व्हिडीओ…
मगनपुरा भागात मनपाच्या लोकांसोबत नागरीकांची हुज्जत