विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० अंतर्गत भोकर शहरात लसीकरण अभियान 

भोकर (प्रतिनिधी)- केंद्र शासन व महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर शहरात विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० अंतर्गत लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे अशी माहिती डॉ अनंत चव्हाण वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांनी दिली.

विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० अभियान पहिला टप्पा दि. ७ ते १२ ऑगस्ट, दुसरा टप्पा दि. ११ ते १६ सप्टेंबर, तिसरा टप्पा ९ ते १४ ऑक्टोबर २०२३ या दरम्यान राबविण्यात येणार आहे.

 

वय ० ते ५ वर्ष वयोगटातील वंचित बालकांचे संपूर्ण लसीकरण या अभियान मध्ये करण्यात येणार आहे. भोकर शहरातील लसीकरण पासून एक ही बालक वंचित राहू नये याची खबरदारी पालकांनी व नागरिकांनी घ्यावी असे आवहान भोकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अनंत चव्हाण, बालरोग तज्ञ डॉ सागर रेड्डी, डॉ सारिका जावळीकर व आरोग्य सहाय्यक सत्यजीत टिप्रेसवार यांनी केले आहे.

 

भोकर शहरात जवळपास १४ लाभार्थी यांची अपेक्षित यादी आहे. आज शेख फरिद नगर येथे ८ लाभार्थी होते त्यांना सर्वाना लसीकरण करण्यात आले व स्थलांतरित १२ लाभार्थी यांना सुध्दा लसीकरण करण्यात आले.

सईद नगर, मुधोळ गली, फुले नगर, ग्रामीण रुग्णालय ( गरोदर माता), समता नगर, शनि मंदिर येथे विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० अंतर्गत लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले आहेत या ठिकाणी लसीकरण पासून वंचित राहिलेल्या बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

या लसीकरण सत्रात ग्रामीण रुग्णालय भोकर येथील आरोग्य सहाय्यक सत्यजीत टिप्रेसवार, अधिपरिचारिका श्रीमती सुचिता नवघडे, जिजा भवरे, राजश्री ब्राम्हणे, आरोग्य कर्मचारी नामदेव कंधारे, आरोग्य सेविका सरस्वती दिवटे, मुक्ता गुट्टे, संगीता पंदीलवाड व ऑनलाइन नोंदणी माया आड़े हे काम करत आहेत. शेख फरीद नगर येथील अंगणवाडी मदतनीस कांताबाई चंद्रे, मदतनीस रमाबाई जाधव यांनी काम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *