नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या लेखणीच्या माध्यमातून लोकांना आज ज्ञान शिकवण्याची ताकत आपल्यात आली असे समजणाऱ्यांनी आपण कोठे जेवण केले, कोठे आपण मुक्काम केला आज आपल्याकडे किती वातानुकूलीत संकुल आहेत याचा विचार ग्रामीण भागातील पत्रकाराची बदनामी करण्याअगोदर करणे आवश्यक आहे. काल परवाच नायगाव येथील दैनिक सत्यप्रभाच्या वार्ताहाराने 10 हजार रुपये मला वर द्यावे लागतात असे बोलत असलेले एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली होती. हे 10 हजार रुपये कोणाचे ? या जागी असणाऱ्याची वाट लावून आपण जागा बळकावली आणि व्हाईट पांढरपेशे असे व्यक्तीमत्व तयार करून पत्रकारीतेत लावलेली वाट कशा पध्दतीने आजपर्यंत पुढे आणली याचा विचार त्यांना पाठीशी घालणाऱ्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पण केला पाहिजे.
कंधार तालुक्यातील एका छोट्याशा गावातून येवून अशोक चव्हाणांच्या शाळेत अगोदर शिक्षक आणि त्यानंतर विविध वर्तमानपत्रांमध्ये पत्रकार म्हणून काम करतांना अशोक चव्हाणांच्या वरदहस्त असणारा संतोष पांडागळे कोठे-कोठे राहत गेला, कसा-कसा जेवण करत गेला, कोणा-कोणाला मुर्ख बनवून रोजचा पॉकेट खर्च काढत होता याचे अनेक अभिलेख आहेत. या अभिलेखांना सत्य म्हणणाऱ्या व्यक्ती आज सुध्दा जिवंत आहेत. सत्यप्रभा या दैनिकाचे कामकाज अगोदर महाजन नावाचे व्यक्ती पाहत होते. अशोक चव्हाणांसारख्या वडाच्या झाडाखाली अनेक छोटे-मोठे तण उगवतात आणि ते तण मोठे होतात हा निसर्ग नियम आहे.त्यात तसे घडले असेल तर त्यात काही नवीन नाही. पण आपली मुळ वृत्ती, मुळ जागा आपल्या झाडाचे मुळ न विसरता जो व्यक्ती पुढे जातो त्याचे कधीच वाईट होत नसते.
परवा एक ऑडीओ व्हायरल झाला तो ऑडीओ व्हायरल कोणी केला यापेक्षा तो ऑडीओ आहे कोणाबद्दल हा महत्वाचा विषय आहे. या ऑडीओमध्ये नायगाव येथील दैनिक सत्यप्रभाचा वार्ताहर कोणाला तरी सांगत आहे तुम्ही माझे ऐका मला दहा हजार रुपये वर द्यावे लागतात नाही तर माझी खुप परेशानी होते मला फक्त 5 हजार रुपयेच द्या. हा ऑडीओ व्हायरल झाल्यानंतर धर्मविर, सत्यवान संतोष पांडागळेने एका वार्ताहरांच्या मिटींगमध्ये झालेली घटना चुकीची असून त्यासाठी सर्व पत्रकारांनी सांभाळून घ्यावे मी नायगावच्या वार्ताहरावर कार्यवाही करणार आहे असे सांगून शेणाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न इतपर्यंत ठिक आहे. तुम्ही तहसीलदारांच्या चेंबरमध्ये तहसीलदारांच्या खुर्ची शेजारी बसता, पोलीस निरिक्षक तर तुमच्या दावणीला बांधलेले आहेत. नांदेड शहरातील कॉंग्रेस नगरसेवकांना तुमची सत्यता विचारली तर ते वेगळेच सांगतात. त्या सर्वा बाबींना अद्याप पंख फुटले नाहीत. यांना पंख फुटले तर मग तुमची काय सत्यता समोर येईल तुमची किती सुंदर प्रतिमा तयार होईल हे आता लिहिण्याची गरज नाही.
ज्या शाळेवर आपण शिक्षक आहात त्या शाळेचा एक तरी तास आपण घेवून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले आहे काय? अशोकराव चव्हाणांमुळे ही मुभा आपल्याला मिळाली आहे. अशोकरावांनी यापेक्षा जास्त आपल्याला द्यावे परंतू आपण माग सुध्दा काढावा याअपेक्षेनेच हा शब्द प्रपंच लिहिला आहे.
संबंधीत ऑडीओ…