मनपातील लाचखोर गिरीश काठीकर कमीत कमी सोमवारपर्यंत तुरूंगातच

नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेचे लिपीक गिरीश काठीकर यांचा तुरूंगवास कमीत कमी सोमवारपर्यंत वाढला आहे.न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत घेतल्यानंतर त्यांना भोवळ आली होती. परंतू दुसऱ्या दिवशी त्यांनी दवाखान्यातून सुट्टी मिळाल्यानंतर ते तुरूंगात वास्तव्यास गेले.
एका व्यक्तीला तुझ्या घराचे बांधकाम बेकायदा आहे ते घर पाडावे लागते असे सांगितल्यानंतर त्या तक्रारदाराला गांधी पुतळ्याजवळील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या मनपा कार्यालयात 2 सप्टेंबर रोजी बोलावण्यात आले होते. घर न पाडण्यासाठी 20 हजारांची लाच एक खाजगी व्यक्ती मिर्झा अफजल बेग शमशोद्दीन बेग याच्याकडे द्यावी असे गिरीश चिंताहरी काठीकर यांनी सांगितले. 20 हजारांची लाच स्विकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गिरीश काठीकर आणि मिर्झा अफजल बेग यांना अटक केली.
3 सप्टेंबर रोजी विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी या दोघांना एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले. त्या दिवशी या दोघांचे वकील वेगवेगळे होते. 4 सप्टेंबर रोजी गिरीश काठीकरच्यावतीने महाविद्वान ऍड.मनिष रामेश्र्वर खांडील(शर्मा) यांचे पर्दापण झाले. त्यादिवशी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले. कायद्याचे खेळ करण्यात पटाईत असणाऱ्या वकीलाने गिरीश काठीकरला भोवळ आणली. त्यामुळे त्यांचे नातलग आणि इतरांनी त्यांना उचलून गाडीत टाकले आणि दवाखान्यात नेले. दवाखान्यात सुध्दा त्यांना भेटायला गेलेली नातलग मंडळी पाहुन त्यांना अजून त्रास झाला. म्हणून त्यांनी 5 सप्टेंबर रोजी दवाखान्यातून डिचार्ज घेवून आपला तुरूंग प्रवास सुरू केला.
काल दि.8 सप्टेंबर रोजी नगर पालिकेतील काही मंडळी आणि ऍड.मनिष रोश्र्वर खांडील न्यायालयाच्या दारात उभे होते. परंतू सायंकाळपर्यंत काही आदेश न्यायालयाने दिला नाही. आज दुसरा शनिवार आणि उद्या रविवार असे दोन सुट्टीचे दिवस आहेत म्हणून आता कमीत कमी सोमवारपर्यंत तरी गिरीश काठीकर यांचा तुरूंगात वास्तव्य सुनिश्चित झाला आहे.
संबंधीत बातमी…

https://vastavnewslive.com/2023/09/04/ऍड-मनिष-शर्मा-यांच्या-पर्/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *