नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र सरकारने गुरुद्वारा बोर्डावर प्रशासन नियुक्तीचे अधिकार आपल्याकडे राखल्यानंतर नांदेड येथील मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी तत्कालीन चेअरमन डॉ.विजय सतबिरसिंघ, मिथ जत्थेदार सिंघ साहेब भाई ज्योतिंदरसिंघजी, हेडग्रंथी भाई कश्मिरसिंघजी, मिथ ग्रंथी भाई विजेंदरसिंघजी, धुपिया भाई रामसिंघजी, अधिक्षक गुरुद्वारा बोर्ड सरदार रणजितसिंघ चिरागीया आणि सहाय्यक अधिक्षक ठाणसिंघ बुंगई यांनी 27 एप्रिल 2014 रोजी झालेल्या बैठकीत पंचप्यारे साहिबानच्या आदेशानुसार गुरूमता जाहीर केला होता. त्यात जुना ऍक्ट बदलू नये असे ठरविले होते.
सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने काल दि.31 डिसेंबर 2023 रोजी पाठविलेल्या प्रेसनोटप्रमाणे सन 2014 मध्ये घेतलेल्या निर्णयावर आजही ते ठाम आहेत. गुरुद्वारा बोर्डाचा कारभार चालविण्यासाठी कशाप्रकारचा बदल हवा अशी मागणी स्थानिक लोक (संगत) यांच्याकडून मागणी करण्यात आलेली नाही आणि जुन्या कायद्यात बदल करण्याची गरज सुध्दा नाही.
मागील काही दिवसांपासून प्रसार माध्यमांमध्ये शासनातर्फे भाटीया अहवाल लागू करण्याबाबत पंचप्यारे साहिबान यांची संम्मती असल्याची खोटी माहिती प्रसारीत करण्यात येत आहे. या भाटीया समितीच्या अहवालावर कोणताही पत्रव्यवहार किंवा घोषणा आम्ही केलेली नसून प्रसार माध्यमांमध्ये येणारी माहिती खोटी आहे असा खुलासा पंचप्यारे साहिबान यांनी केला असल्याचे या प्रसिध्दी पत्रकात लिहिले आहे. या प्रसिध्दी पत्रकाबाबत नांदेड येथील सरदार राजेंद्रसिंघ शाहु यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, या महिन्यात 12 जानेवारी 2024 रोजी दशमपातशाह श्री.गुरुगोविंदसिंघजी महाराज यांचा प्रगट दिन आहे. त्या निमित्ताने माझे असे मत आहे की, महाराष्ट्र शासनाला श्री गुरू ग्रंथ साहिबजींनी आपली चुक सुधारण्याची सद्बुध्दी द्यावी.
पंचप्यारे साहिबानचा नवीन कायद्यासाठी गुरुमताद्वारे (आदेश)विरोधच