नांदेड(प्रतिनिधी)-सगरोळी ता.बिलोली येथे एका शिक्षकाचे आणि इतर एक असे दोन घर फोडून 2 लाख 4 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. नाथनगर देगलूर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 26 हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. कोल्हा ता.मुदखेड येथून 55 हजार रुपये किंमतीची मुरा म्हैस चोरीला गेली आहे. शंकरराव चव्हाण महाविद्यालयातून 3 लाख रुपये किंमतीची जनरेटर मशीन 3 लाख रुपयांची चोरीला गेली आहे. तसेच कैलाशनगर भागातनू 10 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी चोरीला गेली आहे. एकूण 5 चोरी प्रकारांमध्ये 7 लाख 95 हजार 700 रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत डॉ.शंकरराव चव्हाण महाविद्यालय व रुग्णालय आहे. या रुग्णालयातील सांडपाणी शुध्दीकरण करण्याचे एक प्रकल्प लावले आहे. या प्रकल्पासाठी एक जनरेटर मशीन आहे. या मशीनला सुरक्षीत ठेवण्यासाठी जाळी तोडून चोरट्यांनी ती मशीन चोरून नेली आहे. या मशीनची किंमत 3 लाख रुपये आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गवळी अधिक तपास करीत आहेत.
केशवनगर सगरोळी येथील शिक्षक मंगेश भगवंतराव कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते 9 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता त्यांची काकू वारल्याने अंत्यविधी कार्यक्रमासाठी लातूरला गेले होते. सोबतच त्यांच्या शेजारचे चंद्रकांत संभाजी पांचाळ हे दिवाळीच्या सुट्टीमुळे गावाकडे गेले होते. हे दोघे परत आले तेंव्हा दोघांचे घर फोडलेले होते. त्यात सोन्याचे आणि चांदीचे विविध पुजा साहित्य, अंगठ्या, घड्याळ असा एकूण 2 लाख 4 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरला आहे. बिलोली पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक अनिल सनगले अधिक तपास करीत आहेत.
शहाजी किशनराव पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9-10 नोव्हेंबरच्या रात्री कोणी तरी नाथनगर बिलोली येथील त्यांचे घर फोडून घरातील लोखंडी कपाटत तोडले आणि त्यातून सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम असा 1 लाख 26 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरिक्षक मोरे हे करीत आहेत.
कोल्हा ता.मुदखेड येथील बालाजी पुंडलिक जाधव यांची 55 हजार रुपये किंमतीची मुरा म्हैस 8 नोव्हेंबरच्या सायंकाळी 7 ते रात्री 9 या दोन तासाच्या वेळेत कोणी तरी चोरून नेली आहे. उमरी पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार सवई अधिक तपास करीत आहेत.
स्वप्नील शिवलाल सोनवणे यांची 10 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 डब्ल्यू 3718 ही 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर 1 वाजता त्यांच्या घरासमोरून कैलासनगर येथून चोरीला गेली आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे. तपास पोलीस अंमलदार सातारे हे करीत आहेत.
24 तासातील पोलीस दप्तारातील नोंदीप्रमाणे 7 लाख 95 हजारांचा ऐवज चोरीत लंपास