अभिवक्ता संघ ई फाईलिंग प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेणार नाही

नांदेड(प्रतिनिधी)-न्यायालयाच्या मार्फत ई फाईलिंगच्या मुलभुत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत तो पर्यंत ई फाईलिंग प्रशिक्षण शिबिरात अभिवक्ता संघ सहभागी होणार नाही असा ठराव अभिवक्ता संघाने पारीत केला आहे. या संबंधाचे एक निवेदन अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ऍड.सतिश पुंड आणि सचिव ऍड.नितीन कागणे यांच्या स्वाक्षरीने जिल्हा न्यायाधीश-2 यांना देण्यात आले आहे.
2 मार्च रोजी अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ऍड.सतिश पुंड यांच्या अध्यक्षतेत अभिवक्ता संघाच्या कार्यकारणीची बैठक झाली. या बैठकीचा मुख्य विषय ई फाईलिंगबाबत अभिवक्ता संघाच्या सदस्यांना येत असलेल्या अडचणींबाबतचा होता. न्यायालयाच्यावतीने ई फाईलिंग प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात सहभागी व्हावे किंवा नाही या संदर्भाने सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी अभिवक्ता संघाने जोपर्यंत ई फाईलिंग बाबतच्या मुलभुत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत तोपर्यंत ई फाईलिंग हा विषय ऐछिक ठेवण्यात यावा असे ठरले. म्हणून मुलभुत सुविधा उपलब्ध होईपर्यंत न्यायालयाच्यावतीने ई फाईलिंग संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेवू नये असा निर्णय झाला. त्या संदर्भाचे निवेदन अभिवक्ता संघाने जिल्हा न्यायाधीश-2 यांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *