रामजन्मोत्सव सोहळ्याचे प्रमुख कालू ओझा अडकले 377 मध्ये; राजकारणाची पातळी संपली

नांदेड(प्रतिनिधी)-रामजन्मोत्सव सोहळा नांदेडमध्ये सुरू करून त्याची ख्याती दुरपर्यंत पसरवणाऱ्या एका रामभक्ताला राजकारणाचा बळी करण्यात आला आहे. या संदर्भाने रामजन्मोत्सव सोहळ्याचे प्रमुख संतोष उर्फ कालू ओझा यांच्यासह त्यांच्या मातोश्री आणि मोठ्या बंधूविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 377 सह विविध कलमांन्वये इतवारा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भारताच्या अध्यात्मिक ईतिहासात प्रभु श्रीरामांचे अनन्वीत महत्व आहे. आयोध्येच्या श्रीराम मंदिराची चर्चा सन 1984 पासून पुढे आली. नंतर श्रीराम जन्मोत्सोव सोहळा साजरा करण्याचे महत्व वाढले. त्यानुसार नांदेडमध्ये कालू उर्फ संतोष ओझा यांनी दरवर्षी रामजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात सुरू केला. कोणत्याही राजकीय पक्षाची मदत न घेता सुरू करण्यात आलेला हा सोहळा हळूहळू ख्याती प्राप्त होत गेला. यंदाचा राजजन्मोत्सव सोहळा 30 मार्च रोजी साजरा होणार आहे. कालू शर्मा आणि त्यांच्या मित्रमंडळाची वाढलेली ख्याती अनेकांच्या डोळ्यात बोचत होती आणि त्याचा परिणाम असा झाला की, राजकारण करतांना अत्यंत खालच्या स्तरावर जावून कालू शर्माच्या कुटूंबियांचा बळी घेण्यासाठी सुरू झालेले राजकारण काही काळापर्यंत फोपवले गेले. कुटूंबाची सत्य परिस्थिती फक्त कुटूंबच सांगू शकते. परंतू त्या कुटूंबाला रस्त्यावर आणण्यासाठी राजकारण केले गेले. काही दिवसांपुर्वीच कालू शर्मा विरुध्द वजिराबाद पोलीस ठाण्यात आणि इतवारा पोलीस ठाण्यात दोन अ दखल पात्र गुन्हे दाखल झाले. या संदर्भाने एका व्हिडीओच्या आधारे कालू ओझाने दिलेल्या तक्रारीनुसार एक महिला आणि तिच्या वडीलांविरुध्द इतवारा पोलीस ठाण्यात दखल पात्र गुन्हा दाखल झाला.काही जणांनी या प्रकरणाला मध्यस्थिच्या स्वरुपाने सोडविण्याचा देखावा तयार केला. पण त्यात पुर्ण यश आलेच नाही.
या दरम्यान जिअर स्वामी मठाच्या जवळपास 40 ते 45 एकर जमीनीबाबत एक नवीन ट्रस्टची स्थापना होणार असल्याचा सुगावा कालू ओझा यांना लागला. जिअर स्वामी मठाचे मुळ पालकत्व जुना मोंढा भागातील श्रीराममंदिराच्या महंतांकडे आहे. कालू शर्माने ही बाब महंतजींना सांगितली आणि येथून राजकारण जास्तच वळवळले. जिअर स्वामी मठाची संपत्ती, त्याचे पालकत्व असलेले श्रीराममंदिरांचे महंतजी, त्या संपत्तीला आपल्या ताब्यात आणण्याचा प्रयत्न करणारे दुष्ट या सर्वांचा विचार होईल तेंव्हा कालू ओझा हा खरा रामभक्त आहे हेच दिसेल. जिअर स्वामी मठाची संपत्ती आणि त्या संपत्तीचे मुळ पालकत्व श्रीराम मंदिराच्या महंतजींकडे असेल तर इतर कोणी त्या संदर्भाने नवीन विश्र्वस्त मंडळ कसे तयार करू शकते. त्या विश्र्वस्त मंडळात आम्ही एक दुसऱ्याचे विरोधक आहोत असे दाखवणारी मंडळी एकत्र झाली आहे असो. कालू ओझाने महंतजींना सांगितलेली सत्य परिस्थिती आहे. पण त्याचा राग आल्यामुळे काही स्वत:च्या स्वार्थासाठी सामाजिक काम करणारी मंडळी आहोत असे दाखवणारे ते सर्व एकत्र आले. कालू ओझाने मागच्या महानगरपालिका निवडणुकीत निवडणुक लढवली होती पण विजय त्यावेळी त्यांना हुलकावणी देवून गेला. काही दिवसांत महानगरपालिका निवडणुका येणार आहेत आणि म्हणूनच हा राजकीय खेळ करण्यात आला.कोठून तरी फोन आले आणि अखेर काल रात्री 12 वाजण्यास एक मिनिट कमी असतांना इतवारा पोलीसांनी कालू ओझा, त्यांच्या मातोश्री आणि त्यांचा मोठा भाऊ यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 74/2023 दाखल केला. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे 377, 498(अ), 324, 341, 323, 504, 506 आणि 34 जोडण्यात आली आहेत. या गुन्ह्याचा तपास इतवाराचे अत्यंत निरपेक्ष पोलीस निरिक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक रुपाली कांबळे यांच्याकडे देण्यात आला आहे. हजारो वर्षापासून म्हटले जाते सत्य परेशान हो सकता है पराजित नही । असेच या प्रकरणात सुध्दा होईल काय? हा गुन्हा दाखल करतांना गुन्हा घडल्याची वेळ आणि दिनांक असा लिहिला आहे की, सन 2018 पासून आजपावेतो वेळोवेळी सासरी, माहेरी व रस्त्यात अडवून नांदेड येथे झाला आहे. प्राप्त माहितीनुसार तक्रारदार महिला कालू ओझाच्या घरी मागील दीड वर्षापासून नाही. पण म्हणतात ना, “पोलीस खाते करील तेच होईल’.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *