आपले पितळ उघडे होताच वास्तव न्युज लाईव्हच्या संपादकावर राजू दत्तगिर गिरीने गुन्हा दाखल केला

नांदेड(प्रतिनिधी)-वास्तव न्युज लाईव्हच्या खऱ्या बातमीवर बातमी खोटी आहे म्हणून 24 तासापेक्षा जास्त वेळेनंतर वजिराबाद पोलीसांनी वास्तव न्युज लाईव्हच्या संपादकांविरुध्द इतर तिन जणांची नावे घेवून गुन्हा दाखल केला आहे.
टी.व्ही.9 या वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन केले नाहीत काय? त्यांच्या स्टिंग ऑपरेशनमुळे अनेकांची घरे ओसाड झाली. टी.व्ही.9 चा स्टिंग ऑपरेशन झाल्याबरोबर त्यांचे प्रतिनिधी राजू दत्तगिर गिरी यांना मिर्च्या लागल्या. कोणतीही बातमी लिहितांना आपल्या माहितगाराचे नाव उघड करता येत नाही ही माहिती गेल्या 15 वर्षापासून पत्रकारीता करतो म्हणणाऱ्या राजू दत्तगिर गिरीला माहित नाही काय? मागे यांच्यावर सुध्दा खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. तो न्यायालयात सुटला होता त्यावेळी यांच्या वडीलांनी कोणा-कोणाचे पाय धरुन आपल्या पोराला वाचविण्याची विनंती केली होती हे सुध्दा त्यांना आठवत नाही काय? त्यावेळेस झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयात किती चकरा माराव्या लागल्या होत्या. याची जाणिव त्यांना नाही काय?
वास्तव न्युज लाईव्हला प्राप्त झालेला व्हिडीओ स्टिंग ऑपरेशनच आहे. राजू गिरीनेच मला नेमणुक केली आहे असे तो व्यक्ती सांगतो, टी.व्ही.9 चा बुम दाखवतो आणि एक हजार रुपये सुध्दा घेतो. वास्तव न्युज लाईव्हला ही दोन्ही माणसे माहित आहेत. पण खात्रीलायक माहिती देणाऱ्याचे नाव उघड करायचे नसते याची जाणिव वास्तव न्युज लाईव्हला होती म्हणून त्यांनी त्यांची नावे उघड केली नाहीत.
8 ऑक्टोबरला वास्तव न्युज लाईव्हने सायंकाळी 6 वाजता बातमी छापल्यानंतर राजू दत्तगिर गिरीला 9 तारेखला रात्री जाग आली आणि 9 ऑक्टोबरच्या रात्री 10.07 वाजता त्याने दिलेल्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीसांनी वास्तव न्युज लाईव्हचे संपादक कंथक सुर्यतळ(रा.डॉ.आंबेडकरनगर असतांना वजिराबाद असा पत्ता लिहिला) बहुदा राजू गिरीला डॉ.आंबेडकर नावाची अलर्जी असेल. राजू गिरीच्या तक्ररीवरुन भारतीय दंड संहितेच्या कलम 419, 500 आणि 43 नुसार कंथक सूर्यतळ आणि इतर तिघांविरुध्द गुन्हा क्रमांक 446/2023 दाखल करण्यात आला आहे. या एफआयआरवर वजिराबादचे पोलीस निरिक्षक आजही जगदीश भंडरवार हे आहेत असे नमुद आहे. कायद्याच्या पुढे वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा मोठे नाही. जे काही प्रक्रिया कायद्यानुसार होईल ती पुर्ण करण्यास आम्ही तयारच आहोत.
वास्तव न्युज लाईव्हचे संपादक हे अनुसूचित जातीचे व्यक्ती असल्याने त्यांचे नोंदणीकृत असलेले पोर्टल बंद पडावे आणि आपण खाल्लेले शेण इतरांना कळू नये म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वास्तव न्युज लाईव्हच्या संपादकांना राजू गिरी मागील दहा वर्षापासून ओळखतात त्यांना माहित आहे की, कंथक सूर्यतळ हे अनुसूचित जातीचे आहेत. याच जातीय द्वेष भावनेतून वास्तव न्युज लाईव्ह संपादक कंथक सूर्यतळ यांची बदनामी करण्याच्या हेतूने सार्वजनिक रित्या बदनामी केली आहे. सोबतच एका दलालाने बे्रकींग न्युज आणि शासन या दोन व्हाटसऍप संकेत स्थळांवर कंथक सूर्यतळ हे अनुसूचित जातीचे आहेत हे माहित असतांना त्यांची बदनामी होईल असा मजकुर छापलेला आहे. तो मजकुर ब्रेकींग न्युज चे ऍडमीन राजकुमार कोटलवार यांनी आपल्या संकेतस्थळावर टाकला आहे. त्याची स्क्रिन शॉट सुध्दा वास्तव न्युज लाईव्हने सांभाळून ठेवली आहे. कायद्याच्या प्रक्रियेत काम करतांना गुन्हा दाखल झाल्यानंतर फिर्यादीसह आरोपीची बाजू सुध्दा जाणून घेण्याची आवश्यकता फौजदारी प्रक्रिया संहितेने पोलीसांना दिलेली आहे. पाहुया काय होते ते. यावरून असे लिहावे वाटते सत्य परेशान हो सकता है पराजित नही..!
राजू झंवर नावाच्या पत्रकाराला एफआयआरची प्रत कशी प्राप्त झाली हा एक मोठा विषय या प्रकरणातून समोर आला आहे. त्याने आपले पहिल्यांदा टाकलेले व्हाटसऍप संकेत स्थळावरील संदेश डिटील केले. परंतू पुन्हा एफआयआरची प्रत टाकली. यावरून सुध्दा हा जातीय द्वेष भावनेतून केलेलाच प्रकार दिसतो. पोलीसांच्या मागे-पुढे फिरणे, पोलीस निरिक्षकांचा वॉकीटॉकी घेवून रस्त्यावर वावरणे, लोकांना दिसण्यासारखी बंदूक आपल्या कंमरेला लावून फिरणे हे सुध्दा बेकायदेशीरच आहे.

संबधित बातमी…

TV9 मध्ये बातमी लावण्यासाठी हजार रुपये फिस ; 500 राजू गिरीचे आणि 500 बातमी लावण्याचे

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *