नांदेड(प्रतिनिधी)-स्पर्धा परिक्षेची शिकवणी घेतो म्हणून अनेकांची फसवणूक करणाऱ्या चार जणांविरुध्द शिवाजीनगर पोलीसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
गजानन महाराज मंदिर तरोडा येथे राहणाऱ्या एका 50 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मुलीला सन 2017 मध्ये पुणे शहरात भगिरथ अकॅडमीमध्ये ती मुलगी स्पर्धा परिक्षेची शिकवणी घेत असतांना मुलीचे वडील एकदा तिला भेटण्यासाठी जात असतांना रस्त्यात गायकवाड नावाच्या व्यक्तीने तुमच्या मुलीस नोकरी लावून देतो त्या बदल्यात पैसे द्यावे लागतील असे सांगितले. मुलीचे वडील जिवंत असतांना व त्यांच्या मृत्यूनंतर फिर्यादी महिलेकडून सन 2020 ते 2022 दरम्यान बनावट गायकवाड नावाच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून शिवाजीनगर एसबीआय ग्राहक सेवा केंद्र येथून काही रक्कम व इतर ठिकाणाहून काही रक्कम आरोपींच्या नावावर बॅंकेच्या खात्यात पाठवली. त्यांनी त्यांचा नातलग अनिल सोपानवार रा.शिळवणी ता.देगलूर यांनी ते पैसे घेतल्याचे समजले. तेंव्हा फिर्यादी महिला मुलीला नोकरी लागत नाही आणि पैसेही परत मिळत नाहीत म्हणून विचारणा करण्यासाठी गेली होती. तेंव्हा तुझे पैसे पण देणार नाही, कोणाला सांगितले तर समाजात तुझी बदनामी करेल असा व्यवहार त्या महिलेसोबत केला.
पोलीसांनी आपल्या तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून महिलेने न्यायालयात फौजदारी अर्ज क्रमांक 726/2023 दाखल केला. त्यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 156(3) प्रमाणे भारतीय दंड संहितेची कलमे 420, 467, 468, 471, 406, 120 (ब), 504 आणि 506 नुसार शिवाजीनगर पोलीसांनी दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार शिलरत्न ढवळे हे करीत आहेत. या गुन्ह्यांमध्ये आरोपी या सदरात अनिल सोपान पवार, संदीप गोविंदराव वंजे, सुनिल बाबूराव म्हेत्रे, दत्ता सोपान पाल्डेवाड यांची नावे आहेत.
मुलीला नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल