डी. मार्ट जवळ घरातील एकट्या महिलेला मारहाण करून लुट

नांदेड(प्रतिनिधी)-आज दुपारी 1 वाजेच्यासुमारास डीमार्ट रोडवरील एका बॅंक कर्मचाऱ्याच्या घरात घुसून त्या चोरट्याने त्यांच्या पत्नीला जबर मारहाण करून त्यांच्या गळ्यातील काही दागिणे लुटून नेल्याचा प्रकार घडला आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार डी मार्ट रोडवर आशिष दौेडके यांचे घर आहे. ते मराठवाडा ग्रामीण बॅंकेत नोकरीला आहेत. दुपारी 1 वाजेच्यासुमारास त्यांच्या पत्नी शुभांगी ह्या एकट्याच घरात होत्या. त्यावेळी एक 40 वर्षाचा माणुस ज्याने चॉकलेटी रंगाचा शर्ट परिधान केलेला होता. तो आले आणि त्याने हे जाधवचे घर आहे का? अशी विचारणा केली. ही घटना पाहतांना तेथे कौस्तुभ सुर्यवंशी आणि रुक्मीणीबाई इंदुरकर ह्या हजर होत्या. हे जाधव यांचे घर नाही असे सांगितल्यानंतर सूर्यवंशी आणि इंदुरकर आपल्या कामात लागले. तेंव्हा आलेल्या त्या 40 वर्षीय पुरूषाने आशिष दौडके यांच्या घरात बळजबरीने प्रवेश करून आतून दार लावून घेतले. दौडके यांच्या पत्नी शुभांगी यांना जबर मारहाण केली आणि त्यांच्या शरिरावर परिधान केलेले काही दागिणे घेवून हा चोरटा पळून गेला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सूर्यमोहन बोलनवाड अनेक पोलीस अधिकारी, अनेक पोलीस अंमलदार, स्थानिक गुन्हा शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी शुभांगी दौडके यांना उपचारासाठी दवाखान्यात पाठविण्यात आले आहे. पोलीस पथक या घटनेचा सध्या बारकाईने तपास करत असून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. घरात भरपूर रक्त सांडलेले दिसते. पोलीस आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुध्दा करत आहेत. त्यातून चॉकलेटी रंगाचा शर्ट परिधान केलेला व्यक्ती शोधता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *