आपल्याच घरात ओढून 13 मारेकऱ्यांनी युवकाचा खून केला

नांदेड(प्रतिनिधी)-मागील भांडणाच्या कारणावरून आज 11 नोव्हेंबर रोजी पहाटे 5 वाजता जांब (बु) ता.मुखेड येथे 13 जणांनी मिळून एका युवकाचा खून केला आहे.
                    तुकाराम संभाजी कटाळे (35) रा.जांब (बु) ता.मुखेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आज सकाळी 11 नोव्हेंबर रोजी पहाटे 4.30 वाजता संतोष कटाळे हा त्यांचा लहान भाऊ शेता हरभऱ्याच्या पिकास पाणी देण्यासाठी निघाला. 45 मिनिटात सकाळी 5.25 वाजता त्यांचे मामा बालाजी दुरनाळे यांनी फोन करून सांगितले. संभाजी बळीराम कद्राळे व इतरांनी मिळून संतोष संभाजी कटाळेला आपल्या घरात घेवून मारून टाकले आहे. त्यानंतर तुकाराम कटाळे आणि इतर मंडळी काळबा बळीराम कद्राळे यांच्या घरात गेले तेंव्हा त्यांचा भाऊ संतोष संभाजी कटाळे हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. आपल्या तक्रारीत तुकाराम कटाळे लिहितात. माझा लहान भाऊ संतोष संभाजी कटाळेला संभाजी बळीराम कद्राळे, इरबा बळीराम कद्राळे, पुंडलिक बळीराम कद्राळे, काळबा बळीराम कद्राळे, सिध्देश्र्वर संभाजी कद्राळे, रामकिशन येलेवाड, बाळू येलेवाड, शेरु येलेवाड, दिलीप माधव येलेवाड, पिंटू येलेवाड, बळी तुकाराम येलेवाड, गजानन भानुदावस येलेवाड, शिवलिंग बळीराम कद्राळे अशा सर्वांनी मिळून लोखंडी रॉड, काठ्या यांच्या सहाय्याने संतोष कटाळेच्या डोक्यात व शरीरावर मारुन गंभीर दुखापत करून त्याचा खून केला आहे.
                 मुखेड पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 324/2021 भारीतीय दंड संहितेच्या कलम 143, 147, 148, 149 आणि 302 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *