बुधवारी गैर हजेरी दाखवणाऱ्या कोरोनाने गुरुवारी दिला एक नवीन रुग्ण

नांदेड,(प्रतिनिधी) – आज गुरुवारी ७५१ तपासणीत एक कोरोना बाधीत नवीन रुग्ण सापडला आहे.  आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २३ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९७.०४ अशी आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.आज एक नवीन कोरोना रुग्ण सापडला आहे.
कंधार-०२ आणि खाजगी रुग्णालय-०२,अश्या ०४ रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८७७५९ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९७.०४ टक्के आहे.
आज ७५१ अहवालांमध्ये ७४९ निगेटिव्ह आणि ०१ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९०४३१ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ०१ आणि  अँटीजेन तपासणीत ०० असे एकूण ०१ रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी ०० अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ०१ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०० आहेत.आज सापडलेला नवीन रुग्ण मुखेड तालुक्यातील आहे.
                    आज कोरोनाचे २३ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -१०,सरकारी रुग्णालय
विष्णुपुरी-०८, खाजगी रुग्णालयात-०५,असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०२ रुग्ण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *