लातूर,(विमाका)- वृध्दापकाळ चांगल्या प्रकारे घालवता यावा याकरिता शासनाने फेब्रुवारी 1963 मध्ये राज्यातील वृध्दांसाठी मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थामार्फत अनुदान तत्वावर वृध्दाश्रम चालविण्याची योजना सुरू केली. त्याचबरोबर खाजगी संस्थांमार्फत सुध्दा विनाअनुदानित वृध्दाश्रम कार्यरत आहेत. लातूर विभागातील लातूर, धाराशिव, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांतील खाजगी विनाअनुदानित वृध्दाश्रमांनी त्यांच्या विविध मागण्यांबाबत शासनासोबत चर्चा (सहविचार) करण्याच्या अनुषंगाने संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन येथील समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अ.र. देवसटवार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.अधिक माहितीसाठी 02385-255378 या क्रमांकावर संपर्क साधावा.
Related Posts
जलद न्यायासाठी न्याय यंत्रणा कटिबद्ध- न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी
उच्च तंत्रज्ञान व न्यायालयीन कामकाज माहिती प्रणाली न्यायपालिकांची विश्वासार्हता वाढविण्यास सक्षम- न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे ▪️हिमायतनगर व हदगाव येथील दिवाणी…
दोन चोऱ्या; २ लाख ६५ हजरांचा ऐवज लंपास
नांदेड,(प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंत्रीनगर रो हाऊस आणि राजसारथीनगर भागात दोन चोऱ्या घडल्या आहेत.त्यात एकूण २ लाख ६५ हजरांचा…
महानगरपालिकेच्या जंगमवाडी शाळेतील दोन विद्यार्थिनींची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
नांदेड(प्रतिनिधी)- महापालिकेच्या जंगमवाडी शाळेत शिक्षण घेणा-या मुलींनी भारतीय युवा खेल परिषदे अंतर्गत नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय मैदानी स्पर्धेतील ६००…